पान:मनतरंग.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि सत्तरी पार केलेला हौशी म्हातारा. अशा कितीतरी जोड्या...
 गेल्या दहा पंधरा वर्षांपासून पाश्चात्त्य देशांतले म्हातारे पुरुष पर्यटन करायला थायलंड, नेपाळ, भारत येथे मोठ्या प्रमाणावर येतात. थायलंडमध्ये तर जास्तच. त्यांना तेरा-चौदा वर्षांच्या मुली आणि मुले हवी असतात... कळ्यांचा व्यापार थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. वाढत्या विमेन ट्रॅफिक... स्त्रियांच्या व्यापाराला, थांबवता कसे येईल यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांच्या कार्यशाळेत एक नेपाळी कार्यकर्ती तळमळीने बोलत होती.
 जोवर समाजाचे मन माणसाचे होत नाही, त्यावरील धार्मिक, सामाजिक, अंधश्रद्धांची पुटे गळून पडत नाहीत, नवनवीन व्यसनांच्या चिखलातून ते बाहेर येत नाही, दोन वेळच्या भाकरीच्या चिंतेतून त्याची सुटका होत नाही, तोवर समाजातील कळ्यांना फुलण्याचा जन्मसिद्ध अधिकार मिळणार कसा?

■ ■ ■

फुलण्याचा जन्मसिद्ध अधिकार बापच नाकारतो तेव्हा.../१०५