पान:मनतरंग.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या चिमुकल्या गावात ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले होते. नव्या नवलाईचा उत्साह गावातल्या सर्वांतच असे. बाहेरून-परप्रांतातून आलेले तज्ज्ञ डॉक्टरर्स, विद्यार्थी या साऱ्यांची गैरसोय होऊ नये. 'कुठे खेडे गावात येऊन पडलोय' असे त्यांना वाटू नये म्हणून अवघे गाव काळजी घेई. इतकी की चायनीज पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या सोया सॉस, अजिनोमोटो वगैरे काय काय चिजा दुकानदार उत्साहाने घेऊन येत. ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय ही गावाची शान. ती गावकऱ्यांनी राखावी ही भावना. एम- कॉम साठी येणाऱ्या त्रिपुरा मणिपूरच्या मुलांना, वैद्यकीय महाविद्यालयातील थेट अंदमान निकोबार, नागालँड वगैरे भागातून आलेल्या एकट्यादुकट्याला, नवरात्राच्या निमित्ताने मीही घरी बोलावीत असे. मुळात मी रविबाबूंच्या कवितांवर... लोकसाहित्यावर आणि बंगाली भाषेवर अगदी उमलल्या वयापासून अक्षरश: भाळलेली. या मुलांना आईच्या... दिदीच्या हाताने खाऊ घालताना खूप छान वाटे. त्यात एक नागा मुलगा होता. डॉक्टर होऊ घातलेला;
 धर्म, जात, राष्ट्रीयता, भाषा यावर चर्चा होई. एकदा आमचा नागाबंधू अत्यंत नम्रतेने सांगता झाला.

मनतरंग / ९२