पान:मधुमक्षिका.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सूचना.

 ह्या पुस्तक्रांत ‘ मोहनलालाचें प्रवासवर्णन ' ह्मणू- न दोन तीन धडे आहेत. मोहनलाल हा पुरुष मोठ्या कुळांतला होता. त्याच्या आजाचें नांव मणि- राम ; तो दिल्लीच्या दरवारों बऱ्याच प्रतिष्ठेनें असे. त्याचा पुत्र बुधशिंग. हा मौंतस्टुअर्त एलफिन्स्तन सा- हेबांबरोबर पर्शियन शिरस्तेदारीच्या हुद्यावर असून पेशावरास गेला होता. ह्याचा मुलगा मोहनलाल. अगदीं प्रथमारंभीं दिल्लीमध्यें ६ विद्यार्थी इंग्लिश शिकूं लागले, त्यांत हा एक होता. ह्याची बुद्धि चांगली असल्यामुळे हा थोडया काळांत बराच विद्वान् झाला; व त्याला लवकरच काम मिळाले. त्यावर असतां तो पंजाब, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, बल्क, बुखारा, हिरात, विलायत, इत्यादि ठिकाणी साहेबलोकांबरोबर फिरला. तेव्हां त्यानें आपले प्रवासाचें वर्णन लिहिले. त्यांतील कांहीं वेंचे माहितीकरितां व नमुन्याकरितां, येथे घेतले आहेत.
 ह्या पुस्तकांतले दोन तीन लहान लहान धडे खेरीज करून बाकी सर्व इंग्रजीवरून लिहिले आहेत.
 माहे जुलै १८६७ इ०. मुक्काम नेवासें.