पान:मधुमक्षिका.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१४ )

 लोकांचें आचरण पाहून जें वाईट व दुर्विपाक असेल, त्यापासून दूर राहावे; आणि जे चांगले व स- त्परिणाम आढळेल, त्याचा स्वीकार करावा. लोकांचीं दुःखें आणि विपत्ति ह्यांजकडे लक्ष्य देऊन, तशीं परमेश्वरानें आपल्यामागें लाविलीं नाहींत,ह्मणून त्याचे आभार मानावे. ईश्वरकृपेनें जेवढे आपणास प्राप्त असेल, तेवढ्यांत तृप्ति मानून, आपल्या दुःखित बांध- बांस यथाशक्ति साह्य द्यावें.
देवानें तुझांला हात, पाय, डोळे, ज्ञान, बुद्धि, ह्रीं अशासाठीं दिली आहेत की, त्यांपासून तुझी स्वतःचे हित करून घेऊन लोकांचे कामी पडावें, हें लक्षांत ठेवा. आपण सदां दरिद्री व दुःखी आहों, ह्यावरून आपल्या पदरीं दोष किती मोठा असावा, त्याचे स्मरण धरा. आणि इतके पातकी असतांही परमेश्वर दया- लुत्वें आपले संरक्षण करितो, एकदम नाश करीत ना- हीं, ह्याबद्दल त्याचे मोठे उपकार माना; व सर्वकाळ त्याची स्तुति करा.
 कोठेही व कोणत्याही कामांत तुह्मी असला तरी ज्ञानसंपादन चालूच असावें. थिओबालूदिनो, हा लांकडांचे खरेदीकरितां लहानपणीं नोर्वेच्या अरण्यांत_ गेला होता. तेथें त्यानें आपलें काम साधून, शिवाय, वनस्पतिज्ञान पुष्कळ संपादिले; आणि, फिन्स ह्मणून जे रानटी लोक त्याला आढळले, त्यांची सर्व हकीकत मिळवून, ती लिहून, 'रायलसोसायती' नामक विद्वत्सभे- कडे पाठविली. दुसऱ्या, प्युतोली नामक एका गृह- स्थास, तुर्कलोकांनीं धरून आपले बरोबर मक्कस नेलें.