पान:मजूर.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ७ वें .


बबूताईच्या बंगल्यावर-


 या तुम्हीं बबूचाई ! - " मी हसून बबूताईचे स्वागत केलें.
 "आईला झोप लागली आहे का ? - आज प्रकृती कशी आहे ? " बबूताईनी अगोदर आईच्या प्रकृतीची चौकशी केली. आज येतांना बरो- बरच बबूताईनें फळफळावळ, मनुका, वगैरे आणल्या होत्या. येऊन बसल्यावर आपल्या स्वच्छ रेशमी हातरुमालांतील, त्यांनी बरोबर आण- लेले सगळे सोडलें. आणि एका ताटांत भरून ठेविलें.
 "हें काय ? कशाला आजही आणलेंस बबूताई ? " मी म्हणाले.,
 "मी कांहीं तुझ्याकरितां नाहीं आणलें ! आईसाठी आणले आहे !" बबूताई उद्गारली !
 हो पण कां ? -
 “कां म्हणजे ? मला वाटले म्हणून ! त्यांत तुझें काय बिघडलें ?"
 "बरें केलेंस ! " यापेक्षां मी तरी काय बोलणार ! अगोदरच कांहीं तरी म्हणून बोलायला गेलें होतें. तर योग्य उत्तरानें बबूताईनें मला. गप्पच केलें.
 आई पण इतक्यांत जागी झाली. बबूताई अगदीं बिनचूक आलेली पाहून तिला बरें वाटलें. फळें आणलेलीं तिनें पाहिली. " हें कशाला बरें आजही आणायला हवें होतें. " असें आईही बबूताईला म्हणाली. मला जसें बबूताईला सडेतोड उत्तर देतां आलें तसें आईजवळ तिला थोडेंच बोलतां येणार होते ? " उगीच आणलें झालें !" असें म्हणून थोडेसें हंसण्यापेक्षां बबूताई जास्त काय करणार ?
 कांहीं वेळाने बबूताईनें कालच्याचसारखीं आईला फळें सोलून आग्रहानें खायला दिलीं. शाळेतल्या, इकडल्यातिकडल्या बऱ्याच गप्पा- गोष्टी झाल्या. मग मधल्या वेळच्या आईच्या खाण्याची वेळ झाली. रत्नु जागा झाला. तो खायला - खायला म्हणून कडकड करायला लागला. मी