जाते. काढलेल्या चित्रास बहिलोबा आणि बहिलोबाई असे म्हणतात. रोज एक प्रकारच्या फुलांची वा धान्याच्या कणसांची माळ त्यावर बांधली जाते. 'बहिलोबा' या शब्दाची व्युत्पत्ती लावाताना ते नमूद करतात की, 'बहुलता' या समृद्धीवाचक
शब्दापासून 'बहिलोबा वा बहिलोबाबाई ही अपभ्रंश रूपे झाली असावीत. मुली फेर धरून गाणी म्हणत असताना, पुढे मागे झुकून, डुलत आणि लयीत फिरतात असे त्यांनी नोंदवून ठेवले आहे.या लोकोत्सवामागील कृषिसमृद्धीसाठीच्या पूजनाची दखल त्यांनी घेतली आहे. भोंडल्याची अनेक गाणी असतात हे नोंदवून त्यातील सात लोकप्रिय गाण्यांचे त्यांनी संकलन केले आहे. कै. राजवाडे आणि श्री. देवधर यांच्या गाण्यात साम्य असले तरी पाठभेद आहेत.
इंद्रपूजेचा संकेतः हादगा -
महाराष्ट्र लोकसाहित्य मंडळाच्या अध्यक्षा आणि लोकसाहित्याच्या जाणकार डॉ. सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्याच्या २२ व्या खंडात - 'भोंडलाभुलाबाई' या ग्रंथात, महाराष्ट्राच्या विविध भागांत परंपरेने म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांचे, जनसामान्यांपर्यन्त जाऊन संकलन करविले. तसेच या लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक १९श्री. मधुकर वाकोडे या संदर्भात नोंदवतात की 'हादगा' ही केवळ