१. भूमंडल - भोवंडल - भोंडला
२. कोकणात उंडणीची फुले, ज्याला पुन्नागाची फुले म्हणतात. ती विपुल असतात. ही झाडे अतिशय शोभिवंत असतात. या फुलापानांचा हा उत्सव असावा.
बहू + उंडल - भोंडल -भोंडला
३. कोकण हा भात शेतीचा भाग तेच महत्त्वाचे अन्न
बहू + तेंडूल - तेंडूल - भोंडला
४. भोवंडल हा प्राकृत शब्द आहे. भोवंड म्हणजे गरगर फिरणे. फेर धरून नाचण्याशी या शब्दाचा संबंध असावा. ही गाणी फेराची असतात. हादगा कोकण व पश्चिम महाराष्ट्रात खेळला जातो.
१७कै. वि. का. राजवाडे यांनी शतकापूर्वी हादगा उर्फ भोंडल्याच्या एकोणवीस गाण्यांचे संकलन केले. भोंडल्याच्या गाण्यांची ती पहिली संहिता होय. या लोकोत्सवामागचा ते केवळ हेतू शोधत नाही तर, या गाण्यातील शब्दाची व्युत्पत्ती शोधून, ते शब्द गाण्यात का आले असतील याचाही मागोवा घेतला आहे. कै. राजवाडे यांनी या खेळोत्सवांचा संबंध हस्तनक्षत्राशी जोडला आहे. मात्र घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळतांदुळाचा हत्ती मांडून, त्याभोवती फेर धरून गाणी म्हणून पूजा करतात हे त्यांना माहीत नसावे. त्यांनी मुली खडे वेचून आणून ते मांडतात. त्यांची पानाफुलांनी पूजा करतात व गाणी म्हणतात. असे नोंदवून ठेवले आहे. राजवाडे हे कोकणातले. चितपावन ब्राह्मणांत अनेक कुटुंबांतून खड्यांच्या गौरी मांडण्याची प्रथा आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी गौरीचे खडे आणतात. त्यावरून असे लक्षात येते की, कोकणातील मुली हादगा म्हणून खडे मांडत असाव्यात. 'भोंडला या शब्दाचा अर्थ माझ्या ध्यानात येत नाही, हातग्यालाच भोंडले म्हणत असावेत. परंतु निश्चित काही सांगतायेत नाही.' असे ते प्रांजलपणे कबूल करतात. १८श्री. अनंत आबाजी देवधर यांनीही भोंडल्याच्या गाण्यांचा व उत्सव करण्याच्या रीतीचा शोध घेतला आहे. मात्र त्यांनी वर्णिलेली हादगा मांडण्याची रीत कै. राजवाडे यांनी वर्णिलेल्या रीतीपेक्षा वेगळी आहे. कागदावर हत्ती काढून तो भिंतीला चिटकवतात. असे त्यांनी नमूद केले आहे.या कागदासमोर फळफळावळ मांडतात. जिच्या घरी भोंडला मांडतात, तिच्याकडे इतर कुमारिका-मुली डाळतांदूळ घेऊन जातात. ते एकत्र करून जमिनीवर, त्याच्यातून एका पुरुषाचे व बाईचे चित्र काढले
पान:भूमी आणि स्त्री.pdf/८३
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७८
भूमी आणि स्त्री