Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  तेथे होते चिलार बाळ
  चांदीच्या चमच्याने
  मोत्याच्या गादीवर
  निजरे निजरे तान्ह्या बाळा
  मी तर जाते
  सोनारवाड्याचे
  लेकराची

चिलार बाळाला भूक लागली
दूध पाजीयले
बाळ निजविले
(तान्हन बाळा)
सोनारवाडा
दिवे जळे
हसळी गळे...

 लिंबू :जारण-मारण विधीतील एक महत्त्वाचे फळ -
 या गाण्यातून लिंब झेलण्याचा संकेत मिळतो. १३लिंबू हे फळ जारणमारण वगैरे काळ्या जादूच्या विधीत विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्याचा औषधी उपयोगही प्राचीन काळापासून केला जातो. लिंब आणि निंब या दोनही झाडांना लोकगीतांत मानाचे स्थान आहे. वसंतात कोवळ्या पानांनी आणि तवराने फुलून येणारे निंबाचे झाड गारवा देणारे असते. सावली देणारे असते. या गीतात लिंबू या फळाचा उल्लेख आहे. दृष्ट लागू नये म्हणून लिंबलोण उतरवून टाकण्याची लोकप्रथा आजही खेड्यातून दैनंदिन जीवनात पाळली जाते. परंतु लिंब आणि कुंवारकन्या यांच्या साहचर्याचा कल्पनाबंध अस्तित्वात आहे. लिंबविधी हा एक खास विधी आहे. कुमारिकेस नहाण आल्यावर करावयाचा विधी आहे. ही चाल पूर्वी कोकणपट्टीतील काही जातीत रुढ होती. त्याला १४'कुवाराचा लिंब' असेही म्हणत. मुलगी रजस्वला झाली की तिची लिंबांनी ओटी भरीत. हातात निंबाच्या डहाळ्या देऊन मामा तिला खांद्यावर बसवून नदीवर नेई. मामा तोरणीची काठी हातात घेऊन नग्न होऊन भाचीला मांडीवर घेई.नंतर त्या दोघांना घोंगडीने झाकत. नंतर त्या लिंबाचे आणि तोरणीच्या काठीचे नदीत विसर्जन करीत. कर्नाटकात आजही मामाभाचीचा विवाह धर्मसंमत मानला जातो. लोकसाहित्याच्या अभ्यासक दुर्गा भागवत यांच्या मते या प्रथेतून मामाने कुमारिकेचा कौमार्यभंग करायचा असतो असे सुचवायचे असावे. भारताच्या इतर भागांत ही प्रथा आढळत नाही. मात्र ग्रीक परंपरेत भूमध्यसंस्कृतीत आणि आफ्रिकन जमातीत लिंबविधी आढळतो. कुंवारलिंबाची प्रथा लुप्त झाली तरी त्या विषयीची गाणी कोकणात सापडतात. भारतीय संस्कृतिकोशात लिंबविधीची विस्तृत माहिती देताना काही गाण्यांच्या ओळी उद्धृत केल्या आहेत. या गीतात आर्तवाला मृगसरींची उपमा दिली आहे. मृगनक्षत्र लागल्यावर मूमीतून लाल इन्द्रगोप किडे

१२६
भूमी आणि स्त्री