Jump to content

पान:भूमी आणि स्त्री.pdf/१३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाहेर पडतात. ते फिरू लागले की पृथ्वी ऋतुस्नात होते अशी शेतकन्यांची समजूत आहे.
 या लिंबविधीचा संबंध सुफलीकरणाच्या विधीशी आहे. भुलाबाईच्या गाण्यातून येणाऱ्या विविध संदर्भावरून या गाण्यांचे मूळ आर्यपूर्व काळातील भूमीच्या सुफलीकरणासाठी केल्या जाणाऱ्या यातुविधींच्या गाण्यात असावे असे वाटते. लिंब झेलण्याचे हे गाणे सुफलीकरण विधीतून, लिंबविधीतून मुलाबाई आणि हादग्याच्या गाण्यात समाविष्ट झाले असावे.
 वीर हनुमान आणि दास हनुमान -
 याच गाण्यात हनुमंताचा संदर्भ आहे. भोंडला मुलाबाईच्या गाण्यातील हनुमंतांच्या संदर्भाचे विवेचन यापूर्वी केले आहेत. दास मारूती आणि वीर मारूती असे दोन प्रकारचे मारूती वा हनुमानअसतात. आर्यपूर्वकाळापासून क्षेत्रपाळ देवतांचे महत्त्वसकाम साधनेत होते. गाण्यातील हनुमान 'वीर' आहे. हनुमंताची निळी घोडी या टिपणात अनेक मारूतीभक्त मुस्लिमांचा दाखला डॉ. वाकोडे१५ देतात. अनेक मुस्लिमांना हनुमानाबद्दल पूजाभाव होता. असे आढळते.डॉ.वाकोडे यांना निळ्या घोड्याचा संकेत कामदर्शक वाटतो. निळा जांभळा हे रंग कामतत्त्वाचे प्रतीक मानले जातात. इंद्र मोरपंखी निळ्या रंगाचा आहे असे मानले आहे. भारतीय परंपरेने बैल, नांग आणि घोडा यांना शक्तीसामर्थ्याची पुरुषतत्त्वे मानली आहेत.
 कंबळ म्हणजे कमळ. कमळ हे स्त्रीतत्त्व असून ते जीवनोत्पादक आहे. पं. महादेवशास्त्री जोशींच्या मते कमळ म्हणजे भूमी, योनी आणि चित्शक्ती. स्त्रियांच्या पोटावरील परवंटाला केळ किंवा कमळ म्हणतात. या गाण्यातील कमळ, भूमिपूजा आणि योनिपूजेचा संकेत देते. कमळ तोडणारी, कमळांच्या पाठी लागणारी राणी, भूदेवीचे रूप आहे.
 पाण्याच्या शोधात वणवणणारी राणी -
 मराठवाडा, विदर्भ-खानदेशात पाण्याच्या दुष्काळाच्या अनेक क्षेत्रकथा प्रसृत आहेत. या गीतातील राणी पाणी शोधते आहे. परंतु नदीचे पात्र कोरड्या वाळूने भरले आहे. या कोरड्या पात्रातील वाळूत चिलार बाळ खेळते आहे. लोकमानसात काही दृढ संकेत कालौघात तयार होतात. उदा. आई कशी तर यशोदेसारखी, कौसल्येसारखी. बाळ कसे तर कृष्णासारखे किंवा चिलया

भूमी आणि स्त्री
१२७