पान:भूमी आणि स्त्री.pdf/१०६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढच्या ओळीत 'पारवणी बाळाचे गुंजावणीडोळे' असे शब्द आहेत. त्यावरून 'पारवं' म्हणजे कबुतर असा अर्थ घेणेच योग्य ठरते.
 हा संदर्भ शिवकाळातील असावा -
 या जंगली कबुतराचे गुंजांसारखे लालभेदक, विखारी डोळे नायकाने नष्ट केल्याचा संदर्भ इतिहासाचार्य राजवाडे यांना शिवकाळातील वाटतो. दुर्गा भागवतही त्याला दुजोरा देतात. इतिहासाचार्य विवेचन करतात. वेशीच्या बुरूजावर पारवा घुमत होता. तो फकिरासारखा एकटाच होता. त्याचे डोळे गुंजेप्रमाणे लालमडक... विखारी होते. त्याच्या दृष्ट डोळ्यांच्या टिका गावच्या भुलोजी नायकाने काढून टाकल्यानंतर, वेशीच्या दारात मुली पुन्हा खेळ खेळू लागल्या. त्यांच्या मते गाण्यातील हा संदर्भ शिवकाळातील असावा. मुस्लिम फकिरांचा लेकीबाळींना, स्त्रियांना होणारा त्रास भुलोजी नायकाने... पाटलाने दूर केला असावा. मुसलमानी अम्मलं ढिला होण्याच्या काळातील हा संदर्भ असावा. या गाण्यातील 'भुलोजी' चा शोध घेताना दुर्गाताई भागवतांना तो अग्निदेवाचे प्रतीक वाटतो. 'हादगा किंवा भोंडला' या पुल्लिंगीनामावरूनही सर्वच गाणी पुरुषदेवाला उद्देशूनम्हटली असावीत असे त्यांना वाटते. आदिम लोकजीवनात अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व होते. 'अग्नी' चोरण्याच्या कथा जगभर प्रसृत आहेत. भुलाबाई हे पार्वतीचे रूप तर भुलोजी हा शंकराचे रूप. शिव, रूद्र या देवता 'अग्नी'ची रूपे आहेत असे मानले जाते.
 उंडे आणि तीळ - तांदूळ -
 या गाण्यात 'दूधोंडे' या तत्कालीन पक्वान्नाचा उल्लेख येतो. 'उंडे' हे महाराष्ट्रातले लोकप्रियपक्वान्न असावे. महानुभावकालीन वाङ्मयात उंड्यांचा उल्लेख येतो. तसेच लोकप्रिय गाण्यांतूनही येतो.
 उदा. - मला करून दे साखर उंडा
   पिठी साखर आणिक मांडा, मला जेवू घाल
   यश्वदे धरासी चाल, मला जेऊ घाल -
 या गीतात तीळ आणि तांदळाचाही उल्लेख आहे. धार्मिक संस्कारांततीळ-तांदळाचे महत्त्व असते. सणातही तीळ तांदळाला शुभ म्हणून मान असतो. तांदळाचा उपयोग 'अक्षत' म्हणून विशेष सन्मानपूर्वकपणे धार्मिक कार्यात आणि सणात केला जातो. 'तंडुल' हे तृणधान्य आणि तीळ हे गळीत धान्य प्राचीन काळापासून माणसाच्या

भूमी आणि स्त्री
१०१