पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७

 (२) मानसिक-मनोविकार उत्पन्न झाल्याचें अभिनयानें केलेलें दिग्दर्शन ते. हे शांत रसांत येतात.

 (३) आहार्य-वेषाला योग्य शारीरिक अभिनय ते. जसें-सोंड लाऊन गणपती होणें, विष्णूचें सोंग घेऊन चतुर्भुज होणें इत्यादि. हे नाटकांत येतात.

 (४) सात्विक-सत्ववृत्तीपासून होणारे जे शारीरिक विकार ते. हे आठ आहेत. त्यांचीं नांवें व लक्षणें:--

 १ स्तंभ-शरीरधर्माचा गतिनिरोध तो.

 २ स्वेद-अंगावर घर्म उत्पन्न होती तो.

 ३ रोमांच-मनोवृत्तीनें जें अंगावर रोमोत्थान होतें तें.

 ४ स्वरभंग-वाणी गद्गद होते ती.

 ५ वेपथु-भावानें जो शरीरस्पंद तो.

 ६ वैवर्ण्य-वर्णाचा जो अन्यभाव तो.

 ७ अश्रु-विकारानें डोळ्यास पाणी येणें, तो.

 ८ प्रलय-शारीरचेष्टांचा निरोध तो.


  १ स्तभ-शरीरधर्मस्य गतिनिरोधः स्तंभः २ खेद-वपुषि सलिलोद्रमः खेदः ३ रोमांच-विकारसंभवं रोमोत्थानं रोमांचः ४ स्वरभंग-गद्गदत्वप्रयोजकीभूतस्वरस्वभाववैजात्यं स्वरभंग: ५ वेपथु-भावत्वे सति शरीरस्पंदो वेपथुः ६ वैवर्ण्य-विकारप्रभववर्णान्यथाभावो वैवर्ण्यं. ७ अश्रु-विकारजनितमक्षिसलिलमश्रु. ८ प्रलयशारीरसत्वे सति चेष्टानिरोधः प्रलयः.