पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८

* व्यभिचारी किंवा संचारी भाव.

 वर सांगितलेल्या स्थायीभाव संज्ञक प्रीति, उत्साह इत्यादि ९ मनोवृत्ति उत्पन्न झाल्यावर त्यांच्या अनुषंगानें आणखी हर्ष, चिंता, लज्जा इत्यादिक अप्रधान मनोवृत्ति उत्पन्न होतात त्यांस संचारीभाव ह्मणतात. हे तेहतीस आहेत. त्यांचीं नांवें व लक्षणें:-

 निर्वेद-संसाराचे ठिकाणीं अनिच्छा ती.

 ग्लानी-निर्बलता व निस्सहता ती.

 शंका-अनिष्ट हानीचें प्रतिसंधान व इष्ट हानीचा विचार ती.

 असूया-दुसऱ्याचे उत्कर्षाँची असहनता ती.

 मद-हर्षानें जो होणारा उत्कर्ष तो.

 श्रम—आयासाने होणारा जो श्रम तो.

 आलस्य–उद्यानादिकांचें जें अक्षमत्व तो.


  • व्यभिचारीभाव:-

 निर्वेदग्लानिशंकाख्यास्तथाऽसूयामदश्रमाः ||

 अालस्यं (चैव) दैन्यं (च) चिन्ता मोहः स्मृतिर्धृतिः ||

 त्रीडा चपलता हर्ष आवेगो जडता (तथा) |

 गर्वो विषाद औत्सुक्यं निद्राऽपस्मार (एव च) ||

 सुप्तिर्विबोधोऽमर्प (श्च) प्यवहित्थमथोग्रता |

 मतिर्व्याधिस्तथोऽन्मादः (तथा) मरण(मेव च) ||

 त्रास (श्वैव) वितर्क (श्च) विज्ञेया व्यभिचारिणः ||