पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७१

स्थानीं करावा; ज्या प्रकारचा मनुष्य असेल तसें त्यास हास्य उत्पन्न होतें, कारण सभ्य अथवा प्रतिष्ठित लोकांचें जें हास्य तें प्रायः स्मित किंवा हसित असतें. यापेक्षां खालच्या प्रतीचे जे लोक आहेत त्यांचे विहसित अथवा उपहसित हास्य असतें आणि लहान मुलाचें अथवा अजागळ मनुष्याचें हास्य अपहसित किंवा अतिहसित असतें.

भयानकरस.

 भय नामक मनोवृत्तीची पूर्णावस्था, तो भयानक रस होय.

 ह्यांत भय हा स्थायीभाव होय.

 ह्यांचे निर्जन वन, घोरशब्दश्रवण, अक्राळ विक्राळ पुरुषाचे किंवा हिंस्र पशूचें दर्शन, स्मशानभूमि, बलवान् पुरुषाशी स्पर्धा, स्वापराध, कोणत्याही तर्हेचें प्राणसंकट इत्यादि विभाव. व कंप सुटणें, मूर्च्छाना येणे, गांगरणें, इत्यादि अनुभाव. आणि ह्या प्रसंगीं दैन्य, शंका, ग्लानि, आवेग, त्रास, चपलता, अपस्मार, मूर्च्छा, मरण इत्यादि व्यभिचारीभाव.

 उदाहरण — "तें नाटक पाहत असतां त्यांत एक राक्षसाचें सोंग आलें. त्या राक्षसाच्या अंगाचा वर्ण अगदीं कोळशासारखा काळा होता. एक्या हातांत नागवी तरवार होती व एक्या हातांत एक मोठी मशाल होती. तिच्या खालून एक मनुष्य राळ फेंकीत असल्यानें मोठमोठ्या