पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९

 अलंकार हे अर्थास शोभा आणितात, अर्थ विशद करितात, अर्थाला बळकटी आणितात आणि मनोवृत्तीला जागृत करितात. जसें --

शोभा.

 "ह्या सुंदर मंदिरावरून जो मंद मंद सुगंधयुक्त गंधवह येत आहे त्या योगानें फार आनंद होतो.”

 ह्यांत दकाराची आवृत्ति असल्यानें वाक्यास शोभा येऊन तें वाक्य कानास मधुर लागतें.


अर्थविशदीकरण.

 १. "पृथ्वीचा आकार नारिंगाप्रमाणें गोल आहे."

 २. "वारा जोराने वाहू लागला असतां समुद्रांत अनेक लाटा उत्पन्न होऊन त्या त्यांतील तारवास भलतीचकडे घेऊन जातात, तद्वतच एखादा मनुष्य कामक्रोधादिक मनोविकारांच्या कचाट्यांत सांपडला कीं तेही त्यास भलतीकडेच घेऊन जातात."

 ह्यांतील पहिल्या उदाहरणांत नारिंगाची उपमा दिल्यानें दोन बाजूंस पृथ्वी चपटी आहे असा अर्थ विशद झाला. ह्याचप्रमाणें दुसरे उदाहरणांतही समजावें.

बळकटी.

 १. “दुर्जनांवर किती जरी उपकार केले तरी ते अपकार केल्यावांचून राहत नाहींत; सर्पास दूध पाजिलें तरी तो दंश केल्यावांचून राहील काय?"

 २. “ज्याप्रमाणें प्रफुल्लित झालेलें पुष्प एकदां वाळून