पान:भाषाशास्त्र.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ भाषाशास्त्र. बीज. N परंतु, मानवी भाषा कशी उत्पन्न साली, हा एक मोठा प्रश्न प्रथमारंभच उत्पन्न होतो. सबब, बागुदगमाचें मूळ याकडे अगोदर वळले पाहिजे, व हिचे मूळबीज कोठें हग्गोचर होतें, याबद्दलचा कांही दाखला उपलब्ध झाला तर तोही पाहिला पाहिजे. हा दाखला मिळण्याचे मुख्य व विश्वसनीय आगार, किंबहुना सर्वांचेच अपूर्व भाजन म्हटले झणजे, आमचे पुराणतम वेद होत. सबब, त्यांच्याकडे आपण क्षणभर दृष्टी फेकूं, आणि त्या सर्वांच्या शिरोभागी ऋग्वेद व उपनिषदेच असल्यामुळे, त्यांत भाषेसंबंधी कांहीं बीजारो- पण दृष्टीस पडत असल्यास, त्याबद्दलचा विचार करूं. , वाचा, किंवा आपण जी बोलतो ती व्यवहारिक भाषा कशी उत्पन्न झाली, हें शोधून काढण्याला आपल्याला वास्तविक रीतीनें सृष्टीच्या उगमाशीच गेले पाहिजे. कारण, सृष्टी- च्या उत्पत्तीनंतरच भाषेची उत्पत्ती होय, हे कोणासही नाकबूल करवणार नाही. आणि सृष्टयुत्पत्ति हा जरी प्रस्तुत पुस्तकाचा विषय नव्हे, तरी त्या दोघांचा सापेक्षसंबंध असल्याकारणानें, एकीचे विवेचन करतांना, दुसरीविषयों ही दोन शब्द सांगितल्याशिवाय गन्त्यतरच नाहीं. फार खोल पाण्यांत न शिरतां, आपण असे मान्य करूं, किंवा समजूं, अथवा निदान गृहित तरी धरूं • कीं, हें अखिल विश्व केवळ निर्विकार व अद्वैत परब्रह्म असून, फक्त कल्पनेमुळेच ते उत्पत्तिस्थितिलयांस पात्र झाले. असल्याचे भासमान होतें. हचि कल्पना विकारवश होते; तीच अहंकाराला उत्पन्न करिते; व अद्वैताला विरजण