पान:भाषाशास्त्र.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, श्वाने, शब्द, व श्रवणविसार ८५ जिला पश्यन्ति आणि मध्यमा अवस्था क्रमशः प्राप्त होऊन, जिची परिणति वैखरीत झाली, तीच पुढे वाक् म्हणून उ दयास आली. इतकेच नव्हे तर, ती आमच्या पुराणतम आर्य ऋषींच्या मुखाबाहेर पडल्यावर तिच्यांत पदरचने चें सौष्टत्र असल्यामुळे, तिची अर्थातच ऋचा बनली; व हा ऋचासमूहच ॠग्वेद झाला. रामाय- पक्षाच्या शिवाय, सहजगत्या केलेल्या भाषणांतही काव्याचा प्रा. दुर्भाव होऊन, त्याचें पद्य बनते, असे आपल्याला णांत देखील दिसून आले आहे. कारण, कौंच जोडप्यापैकी नराळा एका निषादानें ठार मारल्यावर, त्याच्या मादीला झालेले भर्तृवियोगदुःख पाहून, वाल्मिकि मुनीने त्यास शाप दिला कीं, मानिषादप्रतिष्ठांत्वमगमःशाश्वतीः समाः यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम् ॥ १५ ॥ ( रामायण. बा. कां. सगै २). पुढे, ही स्वतःची वचनोक्ती पादबद्ध असल्याचें त्याच्या मनांत भाले, व ती तशी आहे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटलें; आणि तो आपल्याशींच म्हणाला, पादबद्धोऽक्षर समस्तंत्रीलयसमन्वितः शोकार्तस्य प्रवृत्तोमे श्लोको भवतु नान्यथा १८ ( रामायण. बा. कां. सर्ग २ ). तदनन्तर, ह्याच छन्दोमय वाक्प्रवृत्तीनें, नाल्मिकी ऋषीस मोठे प्रोत्साहन मिळून, त्यानें रामायण रचलें, ब ही गोष्ट सर्व जगासही विश्रुत आहे.