Jump to content

पान:भाषाशास्त्र.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. आपली बस्ती केली. हुँगनू अशी ज्या जातीस संज्ञा होती, तिलाच चिनी लोक तुकिऊ पण ह्मणत. किंबहुना, तुकिऊंचाच तुर्की असा अपभ्रंश होऊन, हा शब्द प्रचा- रांत आला असल्याचे दिसते. ह्यांचा व चिनी लोकांचा नेहेमी, झगडा चाले, व त्यांत त्यांचा पराजय देखील होई. परंतु, योग्य संधी सांपडली कीं, ते पुनश्च चिनी लोकांवर चालून जात, आणि त्यांजला वारंवार त्रास देत. शेवटीं, इ० स० १२५७ साली, त्यांच्यांत अगदी निकराचें युद्ध होऊन, तुर्कीचा पराभव झाला, व व ते तरफण, काशगर, खामिल, आणि अक्सु, येथे जाऊन राहिले. ह्या तुर्कीत अनेक जाती आहेत, व त्यापैकी उझबेग, नोगाई, कुंन्दुर बजाणी, कुमुक, बषकीर, मीसचिराक, कार-कलपाक, तातर, उरणहट, बरबास, याकुत, किरगीज, किरगीज-कासक, किरगीज-बुद्रुक, किरगिज दरम्यान, किरगिज-खुर्द, इत्यादि मुख्य होत. उझबेक हे उम्री आणि हुइहे यांचे वंशज असून, त्यांनी आपला पहिला जळ खोटेन, काशगर, तरफण, व खामिल, येथे दिला. पुढें इ० स० च्या सोळाव्या शतकांत ते जगत्सरित वलांडून पलीकडे गेले, आणि अनेक मोहिमा करून, बाल्ख, स्त्रीवा ( खारिजम, ) बुखारा, व फरवाणा हे प्रांत त्यांनी आ. पस्या कबजांत घेतले. नोगाई जात कास्पियन समुद्राच्या पश्चिमेस आणि काळ्या समुद्राच्या उत्तरेस राहते. इ० स० च्या सतराव्या शतकापर्यंत त्याचा वस्ती कास्पियनच्या ईशान्येस होती, असे इरटिश नंदीच्या डाव्या बाजूला जी तुर्कीच्या जाती व त्यांचा प्रसार.