पान:भाषाशास्त्र.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना.


***---***

केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चंद्रोज्ज्वला
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मुर्धजाः ।
वाण्येकासमलं करोति पुरुषं या संस्कृता धार्यते ।
क्षीयन्ते खलु भूपणानि सततं वागभूषणम् ।

                     (नीतिशतक. )

भाषेची उत्पत्ति कशी झाली,तिचें उद्गमस्थान
कोणतें, तिचें मूळ भाषेंत दृष्टीस पडतें, ह्या
मूळ भाषेपासून कोणकोणत्या शाखा उद्भवल्या, ह्यांचे घटकावयव
कोणते समजावयाचे, इत्यादि विषयक जी मीमांसा
तेंच भाषाशास्त्र होय. हें शास्त्र किती महत्वाचे
व उपयुक्त आहे, आणि तें प्रगल्भ दशेप्रत आणण्यास
आपणांला किती परिश्रम केले पाहिजेत, याविषयी आज
नव्यानेच येथे सांगितले पाहिजे असें नाहीं. कारण, ती
गोष्ट बहुश्रुत समाजास सर्व प्रकारें विदित असून,
विद्वज्जनांस तर त्याचा प्रत्यहीं अनुभवच येत आहे.

      खरोखर भाषा ही एक अपूर्व वस्तु होय; व ती तशी
असल्याबद्दल आमचे पुराण आर्यपूर्वज पूर्णपणें जाणून
होते. शिवाय,ती गोष्ट आमच्या ग्रन्थोदधीवरून
देखील कोणाच्याही लक्षांत सहजीं येण्यासारखी आहे.
(पुढील भाग ५ वा पहा). आणि म्हणूनच त्या प्राक्का-