Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ६७ मूलप्रकृात एका प्रकारची असून, त्यांचा साध होताच त्यांच्या रूपांत * स्थित्यन्तर अशी विकृति होते. त्याचप्रमाणे, अनेक मनुष्यांनी एकच शब्द उच्चारला असता, त्याचा अनेकपटीने उच्चार मोठा होतो. अर्थात्, त्या शब्दाची वृद्धि होते, असे म्हणण्यास हरकत नाही. पण, ज्या वस्तूची वृद्धि किंवा क्षय होतो, ती वस्तु अनित्य होय. सबब, शब्दही अनित्यच समजला पाहिजे, असा प्रतिपक्षाचा आरोप आहे. तथापि, ह्या कोटीक्रमाचे खंडण जैमिन्याचार्य मोठ्या खुबीनें क्रमशः करितात, आणि असे उत्तरपक्ष, अथवा ह्मणतात की, उच्चार केल्यानंतर शब्द पूर्वपक्षाचे खंडण. प्रकट झाला असे जर तुमचे ह्मणणे असेल, तर तुमच्याच प्रतिपादनावरून तो प्रकट होण्यापूर्वी गुप्त होता, ही गोष्ट सहजच निष्पन्न होते. अर्थात् , ह्या विचारसाम्याने शब्दाचे नित्यत्व सिद्ध झाले, हे उघड आहे. आतां, शब्दगुणासंबंधी विचार करितां असे दिसून येते की, शब्द हा गुण आकाशाचा असून, ते नित्य आहे. मात्र, आघातासारख्या निमित्त कारणाने तो व्यक्त होतो; नाहीं तर, ते केवळ प्रच्छन्नावस्थेतच असतो, असे म्हणण्यास हरकत नाही. किंबहुना, योगानंतर त्याचे ज्ञान होते, असे ह्मटले असतांही चालेल. १ समतुतत्र दर्शनम् ॥ १२॥ (अ० १. पा० १. पू०मी०). २ सतः परम् अदर्शनं विषयानागमात् ॥ १३ ॥ (अ० १. पा० १. पू० मी० ) ३ प्रयोगस्य परम् ॥ १४॥ (अ० १. पा० १. पू० मी० ).