पान:भाषाशास्त्र.djvu/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ भाषाशास्त्र. तथापि, शब्द अनित्य आहे, अशा आशयाचा पूर्वपक्ष जैमिनीने केवळ विवाद हेत्वर्थच | शब्दाच्या अनित्यत्वासंबंधी पूर्वपक्ष. न स्वीकारून, त्याचे त्याने खंडनही केले " आहे. आणि ज्यापेक्षा, एतद्विषयक ऊहापोह भाषाशास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्वाचा दिसतो, त्यापेक्षा, त्यांतील"मुद्याच्या गोष्टींचे येथे थोडेसे तरी दिगदर्शन झालेच पाहिजे, हे अगदी रास्त होय. आतां, शब्दाची अनित्यता ठरविण्यासाठी, कित्येक असे प्रतिपादन करितात की, शब्द हा कर्म आहे. म्हणजे, तो कृतीने उत्पन्न होतो. अर्थात्, तो उच्चार केल्याने अस्तित्वांत येतो; व तो उच्चारैताक्षणीच ( शब्दध्वनी ) नाश पावतो. यासाठी, शब्द अनित्य समजावयाचा, दुसरे कारण असे की, शब्दाच्या मूळरूपांत भर्दै किंवा विकृति होते, आणि वृद्धिही झालेली दिसते. उदाहरणार्थ, “स्थिति व “अन्तर' ह्या दोन शब्दांचे प्रथमचे स्वरूप, अथवा १ जैमिनीच्या विचारसरणीचे विवेचन करतांना माधवाचार्यांनी एका प्रकरणाचें नांव अधिकरण असे ठेविले आहे. ह्या अधिकरणाचे पांच घटकावय खाली लिहिल्याप्रमाणे होत :- | १ विषय, २ संशय, 3 संगति, ४ पूर्वपक्ष, आणि ५ सिद्धान्त. ह्यांपैकीं, पूर्वपक्ष म्हणजे विरुद्ध पक्षाचे प्रतिपादन होय, असे समजावे. २ कमैंके तत्र दर्शनात् ॥ ६॥ ( अ० १, पा० १. पूर्व मीमांसा. ) ३ अस्थानात् ॥ ७॥ ( अ० १. पा० १. पू० मी० ). * प्रकृतिविकृत्योश्च ॥ १०॥ (अ० १. पा० १० पू० मी०). ५ वृद्धिश्च कर्तृभूम्नास्य ॥ ११॥(अ० १. पा० १.१० मी०).