यत्न. भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ६३ लेले असतात. त्यामुळे, कोणतीही गोष्ट मनांत आल्याबरोबर, त्याचा परिणाम इच्छिलेल्या ठिकाणच्या ज्ञानतंतूवर एकदम घडून, त्याप्रमाणे ताबडतोब कार्य होते. अर्थात्, इच्छा शक्तीचे हे अशा प्रकारचे प्राबल्य झाल्यानेच तिचा मनावर संस्कार घडते, व ह्याचा धक्का ज्ञानतंतूस लागून, ते त्या या इन्द्रियाकडून ईप्सित व्यापार आणि अभिलषित क्रिया करवून घेतात. ह्या संबंधाने, आमच्या पूर्वजांनी फार प्राचीन काळीं ह्या मीमांसेसंबंधीं देखील इतक्या बारकाईने व शोधकआमच्या पूर्वजांचे प्र- बुद्धीने विचार केला होता की, त्याब । द्दल त्यांची जेवढी म्हणून स्तुति करावी तेवढी थोडीच. स्वरशास्त्र, ध्वनिविवेचन, आणि श्रवणोत्पत्ति, याबद्दलचा तपशिलवार ऊहापोह प्रातिशाख्य सूत्रांत केला असून, पाणिनीच्या शिक्षेतही तद्विषयक साद्यन्त विवेचन केले आहे. सबब, वाचकांच्या सोईसाठी, त्यांतील अवश्य तितका उतारा येथे देत:- आत्मा बुध्या समेत्यार्थान्मनो युक्ते विवक्षया ।। मनःकायाग्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् ।। ६ ॥ मारुतस्तूरसिचरन् मन्द्रं जनयति स्वरम् । प्रातः सवनयोगन्तं छन्दोगायत्रमाश्रितम् ॥७॥ शिक्षा. (पुढील भाग ६ वा पहा.) । अस्तु, आपले मनोगत प्रकट करण्यासाठी ज्या इच्छा शब्द आणि अर्थ, शक्तांच्या योगाने वायु प्रेरित झाला: व त्याचा उपयोग. ज्या वायूमुळे ध्वनि उद्भवला; ज्या
पान:भाषाशास्त्र.djvu/74
Appearance