Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ६१ व्यापार चालण्याला केवळ ध्वानच इन्द्रियांचे व्यापार कारण होतो, असे नाही. तर, ध्वनीचालण्याला, ध्वनीखेरीज अन्य कारणे. खेरीज, दुसरी देखील नानाविधकारणे उत्पन्न होतात, आणि त्या योगाने दैहिक व्यापार एकसारखे चालूच राहतात. उदाहरणार्थ विकारवशतेच्या तीव्र प्रभावाने, अथवा प्रबल इच्छेचे सवेग स्फुरण झाल्याने, अन्तराकाशांत मनस्तरंगांचा अव्याहत उद्भव होऊन, त्यांचा प्रवाह एकदम वाहू लागतो. अर्थात्, आपले मनोगत व्यक्त करण्याची इच्छा अन्त:स्थित चालकाला झाल्यावर, त्याच्या इच्छाशक्तीचा परिणाम मनावर होऊन, हे मन वागिन्द्रियांची द्वारें खुली करण्याचा एकदम प्रयत्न करते. त्यायोगाने, हृदाकाशांतील वायु प्रेरित होऊन, वाचेचा आधारस्तंभ जो ध्वनि, त्याचे सहजींच बीजारोपण होते. आता, वास्तविक विचार केला तर असे दिसून येईल की, वाचेच्या बीजारोपणाची हीच प्रथमावस्था असून, तिला परा में पारिभाषिक नामधेय आहे. पुढे, ह्या अवस्थेतल्या वायूचे स्थलांतर व स्थित्यन्तर होऊन, त्याचा द्वितीयावस्थेत प्रवेश होतो, आणि ह्या स्थितीत त्याला पश्यन्ती म्हणतात. तदनन्तर, इच्छाशक्तीच्या नेटाने, ह्या वायूची एकसारखी प्रगतीच असल्यामुळे, त्याला तिसरी म्हणजे मध्यमावस्था प्राप्त होऊन, तो मुखविवरांत लागलीच शिरतो, आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. हे त्याचे चौथे अवस्थान्तर हाय, व ह्यालाच वैखरी अशी संज्ञा आहे. ही वैखरी, अथवा हा वायुरूपी ध्वनि, मुखपटांतून बाहेर पडतांना, त्या