पान:भाषाशास्त्र.djvu/64

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ५३ असो. यूरोपांतील तुर्कस्थान, आशियाखुर्द ( म्हणजे तुर्कीत इराणीचे आशिया मायनर ), व सीरिया, झालेले मिश्रण, व येथील तुर्की लोक, खोरासान आणि त्यामुळे तुर्कीला प्राप्त पूर्व-इराण येथूनच आले. हे सेलझालेले प्रौढत्व. जुक घराण्यांतले असून, मध्ययुगांत कांहीं कालपर्यंत, त्यांचे इराणांत देखील राज्य होते. त्यामुळे, तुर्की व इराणी यांचे परस्पर विशेष संघट्टन होऊन, तुक भाषा जरा जोरावत चालली. कारण, इराणी शब्द, इराणी भाषाप्रचार, आणि इराणी विद्या, इत्यादींची तीत भर पडून, ती सहजच ऊर्जित दशेस येऊ लागली. पुढे, कालान्तराने, तुर्की लोक देखील इतस्ततः पसरत चालले, आणि त्या योगाने त्यांच्या भाषेचाही आपोआप फैलाव होत गेला. त्यांची एकंदर संख्या सुमारे १,१०,००,००० पासून १,२०,००,००० पर्यंतच होईल. तथापि, त्यांचे राज्य आशिया, यूरोप, व आफ्रिका, या तिन्ही खंडांत असल्याने, तुर्कस्थान, सीरिया, मिसर देश ( ईजिप्त ), त्रिपोली, आणि ट्युनिस, या देशांत, व सरकार दरबारांत, तुर्की भाषाच चालते. फार तर काय सांगावे, पण, इराणांत तेहरान वगैरे ठिकाणी सुद्धां, तुर्की भाषेचेच चलन आहे. त्यामुळे, ह्या भाषेला सर्व प्रकारे प्रोत्साहन व राजाश्रय मिळून, ती हळू हळू पुढेच सरसावत आहे, हे विशेष रीतीने सांगावयास नलगे. ४ फिनी भाषेची जन्मभूमि यूरल पर्वतांत असून, फिनी भाषा. तेथूनच ह्या लोकांचा प्रसार पूर्वेस, पश्चिमेस, आणि दक्षिण दिशेकडे काळ्या समुद्रापर्यंत झाला