पान:भाषाशास्त्र.djvu/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६

  • भाषाशास्त्र. त्या कारणाने, मोगली भाषेची स्थिति देखील तुंगुसी भाषेप्रमाणेच आहे, असे झटले असतां कांहीं एक बाध येणार नाहीं.

तुर्की भाषेचा विस्तार बराच मोठा असल्याचे दिसते. कारण, लेनानदी, उत्तरमहासागर, उका भाषा: व ऑडियाटिक समुद्र, यांच्या योगानें जो अनियमित त्रिकोणाकृति प्रदेश बनतो, त्यांतच ह्या भाषेची व्याप्त आहे. तथापि, यूरोपांतील तुर्की लोकांची संख्या सुमारे २०,००,००० असून, त्यापैकी असंकीण तुर्क अजमासे ७,००,००० असावेत, असे शफरिकचे मत आहे. तुक लोकांना चिनी लोक हुंगनू म्हणत. ह्यांनी | इ० स० पूर्वी २०६ वर्षाच्या सुमारास, तुर्कीस चिनी लोकांनी दिलेली संज्ञा. ला चीनच्या पश्चिमेकडील आशिया । खंडांतील ब-याच मुलुखावर आपले वर्चस्व स्थापिले होते. परंतु, कालान्तराने चिनी लोकांनी त्यांस जिंकून हांकून लावल्यामुळे, ते सरकत सरकत पश्चिमेकडे गेले; आणि शनैः शनैः त्यांनी आपला प्रवेश यूरोप खंडांतही केला. पुढे इ० स० ५६८ सालाच्या सुमारास, तुर्की लोकांनी व्होल्गा नदी व अझोफसमुद्र यांच्या दरम्यानचा प्रदेश व्यापून टाकिला, आणि इराण, आरमीनिया, शीखान, इत्यादि ठिकाणी सुद्धा त्यांनी १ स्वीडन देशाचा कास्ट्रीन नामक एक मोठा प्रवाशी होऊन गेला असून, त्याने तुराणी भाषासंबंधी बराच शोध केला आहे. मॉक्समुलर रुत भाषापरीक्षण, (Survey of Languages) पहा.