२७
भरतखंडांतील केवळ व्यवहारिक भाषाच होती. तेव्हां,तिचे व्यवहारिकत्व प्रतिष्ठापित होऊन, ती प्रचलित भाषा होण्याला अनेक शतकें लोटली पाहिजेत, हे उघड आहे.आणि म्हणूनच, पौराणत्वाच्या संबंधाने ती हीब्यूला देखील मागे सारते, असे म्हटल्यावांचून राहवत नाही. किंबहुना, संस्कृताच्या पौराणत्वाची शंका घेणारास हे प्रमाण केवळ निरुत्तर करण्यासारखेच आहे, असे म्हटले असतांही चालेल,
तथापि, आपण आणखीही अन्य प्रमाण पाहूं, आणि संस्कृत भाषेच्या प्राचीनत्वासंबंधी अवश्य तो ज्यास्त तपास करूं. मिसरदेश, आसीरिया, सीरिया, बॉबिलनु, चाल्डिया, इराण, इत्यादि देशांत शराकृति लिपीत लिहिलेले पौराणिक शिलालेख अजूनही सांपडतात. हे लेख फार पुराण असल्याविषयीं शोधकांचे मत आहे; व झन्द भाषा यांच्याहीपेक्षां पुराणतर असल्याचे पाश्चात्य विद्वान देखील प्रतिपादन करतात. .
इंन्द अविष्टा नांवाचा पारसीकांचा केवळ सर्वमान्य व
१ ह्या बाबतीत मॉक्समुलरने असे लिहिले आहे की,
" It must suffice if we have proved, that he (Zoraaster ) lived, and that his language, the Zend, as a real language, and anterior in time to the language of the cuneifrom inscriptions..
सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.)
२ झन्द हा छन्द शब्दाचा अपभ्रंश आहे, व अविष्टा शब्द अवस्था शब्दाचे रूपान्तर होय. अर्थात्, छन्द अवस्थेत असणान्या ग्रंथास झन्दअविष्टा अशी संज्ञा पडल्याचे दिसते.