पान:भाषाशास्त्र.djvu/352

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४३ भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. तात्पर्य, ख्रिस्ती धर्माने भाषाशास्त्रास खरी मदत न होता, उलट, कित्येक पाश्चात्यांच्या नसत्या दुराग्रहामुळे, ते शास्त्र कांहीं बाबतींत अगदी लंगडेच पडल्यासारखे झाले होते, असेही म्हणावे लागते. सबब, अशा प्रकारच्या महत्वाच्या शास्त्रीय शोधांत, धर्मवेडाचा किंवा लटक्या स्वधर्मप्रीतीचा लेशमात्रही उपयोग होत नसल्याकारणाने, आपल्याला ही दिशा सोडून, खरे काय आहे ते कळण्यासाठी, अन्यमार्गाचेच अवश्य अवलंबन केले पाहिजे. आतां, भाषाशास्त्राचे खरे मूळ संस्कृत होय. आणि म्हणूनच, संस्कृत भाषेचे चांगले भाषाशास्त्राचे सर परिशीलन झाल्याशिवाय, ह्या शामूळ संस्कृत. स्त्राची प्रगत व त्यांत अभिनिवेश होण्याला अन्य साधनच नाही, ही गोष्ट मुख्यत्वेकरून लक्षात ठेविली पाहिजे. तसेच, संस्कृत भाषेचे महत्व प्रथ. मतः कोणाच्या ध्यानात आले; पाश्चात्यापैकी, तिजकडे कोणकोणत्या राष्ट्रांनी आपले लक्ष्य पुरविले; केव्हांपासून त्यांनी तिचे अध्ययन सुरू केलें; सर्व भाषांत तीच एक नांवाजण्यासारखी व अपूर्व भाषा आहे, असे त्यांस केव्ही कळून आले; ही भाषा पूर्णत्वाच्या संबंधाने सर्वांच्या शिरोभाग आहे असे समजल्यावर, तिचा उपयोग कशा प्रकारे करून घेण्यांत आला; आणि ह्या अमूल्यशोधांचा भाषाशास्त्रावर एकंदर परिणाम कसा झाला; इत्यादि गोष्टी देखील नितान्त महत्वाच्या आहेत. सबब, त्याबद्दल अवश्य ते दिग्दर्शन यथावकाश करूं. पाश्चात्यांच्या अज्ञानामुळे, संस्कृत भाषेवर जो दीर्घकालप.