३३६ भाषाशास्त्र. त्यांचे व्याकरण तयार करण्यास सांगितलें; आणि त्या परस्परांत क्वाचित साम्य दृष्टीस पडल्यास, त्याची विशेष नोंद करून ठेवण्यासही हुकूम दिला. पुढे, कालान्तराने, सर्व सामग्री एकत्र झाल्यावर, तिने एक प्रचंड कोश तयार करविला, व त्याला बादशाहीकोश असे नांव दिले. अर्थात्, हा अनेक भाषांचे साम्य दाखविणारा कोश होता, व तो प्रथमतः इ. स. १७८७ साली प्रसिद्ध झाला. असो. प्राक्कालीन यूरोपखंडात भाषाशास्त्रविषयक कोणत्या प्रकारचे प्रयत्न चालले होते, याचे सामान्य दिग्: दर्शन होण्यासाठीं, अवश्य ती माहिती वाचकापुढे सादर केली. सबब, आतां क्षणभर पूर्व बाजूकडे वळू, आणि मिसर, आरबस्थान, आसीरिया, सीरिया, चाल्डिया, बाबिलन्, इत्यादि प्राचीन प्रांतांत, त्याबद्दलची कोणत्या धोरणाने कशी तजवीज झाली होती, हे पाहूं. भरतखंडानन्तर, प्राचीनत्वाच्या संबंधानें मिसैर देशाची भाषाशास्त्र विषय- गणना होते. परंतु, तेथे सुद्धा, भाषाक मिसर देशांतील शास्त्रविषयक कोणतीही चळवळ प्रयत्नाभाव. सुरू असलेली दिसत नाही. मात्र, शिकन्दराच्या स्वारीनंतर, परगेमम् व शिकन्दरा येथे, | १ कित्येक पाश्चात्य मिसर देशालाच पुराणतर समजतात. परंतु, ही त्यांची चूक आहे. कारण, मिश्री लोकांनी आह्मा भारतीयाचे अनुकरण करून, आमचीच सुधारणा उचलली आहे, असे मिश्री ( इजिपूशियन् ) लोकांच्या संस्था व त्यांचा इतिहास पाहिल्याने कोणाच्याही ध्यानात सहज येण्यासारखे आहे; आणि पश्यात्यांस देखील ती गोष्ट कबूल करावी लागते. अर्थात्, आमच्या वर्ण ( पुढे चालू. )
पान:भाषाशास्त्र.djvu/345
Appearance