पान:भाषाशास्त्र.djvu/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३४ भाषाशास्त्र. वेधले गेले. पुढे, तो रोममध्ये येऊन राहिला, व त्या ठि. काणी इतालियन भाषेशी त्याचा विशेष परिचय झाला. त्या कारणाने, त्याचे बहुतेक ग्रंथ ह्याच भाषेत लिहिलेले आढळतात. ह्यांचे स्पॉनिशमध्येही भाषांतर झाले आहे, आणि ते अनेक विषयांवर आहेत. ह्यापैकी, भाषाशास्वाच्या संबंधानें “भाषासंग्रह ' नांवाचा त्याचा ग्रंथ विशेष महत्वाचा होय. ह्याचे सहा भाग असून, ते स्पानिश भाषेत इ. स. १८०० साली प्रसिद्ध झाला. ह्यांत तीनशेपेक्षा ज्यास्त भाषांची हकीकत दिली आहे. (मागे पान १६ पहा.) ह्याने चाळीस पेक्षा ज्यास्त भाषांची व्याकरणे लिहिली, । आणि विभक्ति व क्रियापदांचे प्रत्यय, त्याचे भाषाज्ञान. यांवरून असे सिद्ध केले की, हीब्यू, चाल्डी, सीरिक, आरबी, सिद्दी, व अम्हरी, ह्या सर्व भाषा शैमी कुटुंबांतील एका मूळ भाषेच्याच शाखा होत. एवढेच नव्हे तर, सर्व मानव प्राण्यांची मूळभाषा हीब्यूच आहे, असे प्रतिपादन करणे ह्मणजे केवळ अशास्त्र, आणि भाषाशास्त्राची निव्वळ थट्टाच होय. ह्याशिवाय, हरवॉसचें आणखी असेही मत असे की, भाषांचे साम्य किंवा कुटुंब फक्त शब्दसादृश्यानेच ठरवितां येण्यासारखे नसून, व्याकरतुल्यत्वाने मात्र ते निश्चित होण्याजोगे आहे. १ Catalogue of Languages, in Six volumes. २ Catalogo. I. 63. ३ Catalogo. II. 468. * ह्या संबंधाने, लॉर्ड मॉनवोड्ने देखील आपला अभिप्राय अशाच मासल्याचा दिला आहे. तो एके ठिकाणी असे ह्मणतो की, * My last observation is, that, as the art of a ( पुढे चालू. ) ।