पान:भाषाशास्त्र.djvu/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३३३ यश, आपण संपादावे. तसेच, ख्रिस्ताच्या दहा आज्ञांचे तरजुमे भिन्न भिन्न भाषांत तयार करवावे. की, जेणे करून, निरनिराळ्या राष्ट्रांचे मूळे व त्यांची हालचाल कसकशी होत गेली, हे कळण्यास सुलभ पडेल. इतकेच नव्हे तर, ख्रिस्ती धर्माचा प्रसार होण्यासही, त्या योगाने उत्तम साधन उपलब्ध होईल.' बादशाहाच्या नांवचे हे पत्र व्हियेना येथून तारीख | २६ अक्टोबर इ. स. १७१३ अन्य गृहस्थांस वि साली लिहिले असून, ह्या खेरीज नंती. भाषेच्या संबंधाने आणखीही पत्रे लीबनिझनें अन्य गृहस्थांस लिहिली होती. सर्व भाषांचे मूळ एकच असल्याविषयी त्याचे मत असे; आणि ज्या भाषा आपणांस ठाऊक आहेत, व ज्यांची माहिती आपणांस उपलब्ध आहे, त्यांची तुलना करून त्यांचे साम्य कोठे दृग्गोचर होते; कोणत्या भाषेतून कसा शब्द उद्भवला; त्याचे रूपान्तर कसे बनले; ते कोणत्या कारणांनी झाले; इत्यादींचा शोध करण्याबद्दल त्याचा प्रथम पासूनच प्रयत्न होता. लीबनिझंप्रमाणेच हरवासने देखील भाषाशास्त्र उद यास आणण्याच्या कामी पुष्कळ हरवासूचे परिश्रम. परिश्रम केले होते, यात शंका नाहीं. शाचा काळ इ. स. १७३९ पासून १८०९ पर्यंत असून, तो जन्मतः स्पॉनियर्ड होता. तो अमेरिकेत असतो भिन्न भिन्न जातींशी त्याचा संबंध येई. त्यामुळे, अनेक भाषांचे अवलोकन होऊन, त्याचे चित्त भाषाशास्त्राकडे