पान:भाषाशास्त्र.djvu/328

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ई भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३१९ अशा रीतीने विद्याभिवृद्धीची हालचाल ह्या काळांत | बरीच दिसून येते. परंतु, ती सर्व भाषाशास्त्रविषयक भाषान्तर रूपाने हाती, असे म्हणण्यास शेाधाचा अभाव. कांहींएक हरकत नाही. कारण, पाश्चात्यदेशांत, भाषेच्यासंबंधाने शास्त्रीय शोधाची अजून देखील बिलकुल सुरवात नव्हती. प्लुटो (इ. स. पू. ३८९) व ऑरि - स्टॉटलू (इ. स. पू. ३३६) हे मोठे शोधक, विद्वान, आणि नामांकित तत्ववेत्ते असल्याविषयी ख्याति आहे. तथापि, त्यांनी सुद्धां भाषाशास्त्र संबंधी कांहींच परिश्रम केले नव्हते; व ग्रीससारख्या सुधारलेल्या देशांत मुद्धां, इ. स. पूर्वी ३९ वर्षांपर्यंत त्याचा गंध देखील नव्हता, असे म्हणावे लागते. डायोनिशियस थाक्स हा तिकडील पहिला व्याकरणकार होय, असे माक्समुलरचे म्हणणे आहे; आणि ह्याचा काळ इ. स. पू. ४०।३९ वर्षे असल्याचे समजते. ह्यावरून, भाषाशास्त्राचा ओनामा पाश्चात्य देशांत अजूनही सुरू नव्हता, यात शंका नाहीं. १ • Dionysius ...... the author of the first practical graminar. ... ... ( Science of Language. vol. I. P. I07. 1880 ). २ ज्ञानाच्या कांहीं शाखांत आरिस्टॉटलची प्रवीणता असतांही भाषाशास्त्रांत त्याने कोणता देखील शोध केला नाही, याबद्ल फारच वाईट वाटते. इतकेच नव्हे तर, हा पाश्चात्य दीप मावळल्या नंतर सुमारे दोन हजार वर्षांपर्यंत, ह्या महत्वाच्या विषयांत म्हणण्यासारखा प्रयत्न कोणीच केला नाही, हे आश्चर्यकारक होय. आणि ही गोष्ट पाश्चात्यांस सुद्धां कबूल करावी लागते. ह्यासंबंधाने एके ठिकाणीं मॉक्समुलर म्हणतो :- ( पुढे चालू. )