पान:भाषाशास्त्र.djvu/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ळवळ. ३१८ भाषाशास्त्र, तिक, तत्वज्ञ आणि मीमांसक, इत्यादींच्या सुकीतींचा मोहक परिमल सर्वत्र पसरलेला असल्यामुळे, त्यांच्या ज्ञानदधींत पोहोण्याची ज्याला ज्याला म्हणून संधी मिळाली, त्याने त्याने अहर्निशी सतत प्रयत्न केला. पुढे, अशाच प्रकारची चळवळ सुरू असल्याने, ढाँलेभाषान्तराची च मीच्या कारकीर्दीत सेप्चु आजट् | नांवाचे जुन्या कराराचे भाषान्तर झाले. कोणी असेही सांगतात की, इ. स. पूर्वी २८७-२४६ च्या सुमारास, डिमिट्रियस् फेलेरियस हा शिकंदराबादेस मुख्य ग्रंथाधिपति असून, त्याच्या शिफार शीवरूनच टॉलमियस फिलाडेल्फसने आरिस्टियस् नांवाच ज्यू, बायबलाचे हस्तलिखित प्राप्त व्हावे, आणि त्याचे भाष'- न्तर करण्यासाठी सत्तर दुभाषे मिळावे या हतने, जरूसलम् येथे पाठविला होता. तथापि, कित्येकांचा अभिप्राय याहून अगदी भिन्न आहे. ते असे म्हणतात की, कांहीं ग्रीक ज्यू शिकंदराबादेस राहत असत. परंतु, ते आपली स्वभाषा बिलकुल विसरून गेले होते. त्यामुळे, त्यांनीच - पल्यासाठी, हे भाषान्तर करविले. पण, ते कसेही असले तरी, इ. स. पूर्वी २८५ वर्षांच्या सुमारास, हीब्यू बायबलतील ब-याच भागांचे भाषांतर, निरनिराळ्या विद्वानांनी ग्रीक भाषेत केले होते, यांत तिळमात्रही शंका नाहीं. ह्याच सुमारास झन्दअविष्टचे भाषान्तर देखील ग्रीक मध्ये झाले असून, ते हर्मिप्पस्ने केले असल्याविषयीं प्लिनीचे म्हणणे आहे. | १ हा हर्मिप्पस अरिस्टॉटलंच्या दीक्षेतील होता. ह्याच्या गुरूचे नांव क्यालिमेकस असे, व शिकन्दराबादेत ह्याची गणना नामांकित विद्वानांत होई. २ ( ३०. २ ).