Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१६ भाषाशास्त्र. डिमाँक्रिटस सुद्धां इकडे आले होते, असे अनेक ग्रीक ग्रंथकारांच्या लेखांवरून कळून येते. तां, ब्राह्मणांच्या ग्रंथसंपत्तीने ज्याप्रमाणे ग्रीक लोकां| ब्राह्मणांच्या ग्रंथ- वर आपला पगडा बसविला, त्याचसंपत्तीचा ग्रीक लोकां- प्रमाणे शिकंदराच्या स्वारीने, ग्रीक वर परिणाम, व ह्यांचा लोकांच्या सहवासाचा परिणाम मिदुस-यांवर. दुस-यांवर. | सर ( ईजिप्त ), टायर, बाबिलन्, इत्यादि देशांवर झाला, यांत तिळमात्रही शंका नाही. कारण, आपापल्या देशाच्या मूलसाधनांवरून, बिरोसम्ने बॉबिलनचा इतिहास लिहिला. मिनॉण्डरने टायरचा इतिहास तयार केला. आणि मॉनिथोनें मिसर देशाचा इतिहास रचला. परंतु, मोठ्या दुःखाची गोष्ट ही की, एवढ्या परिश्रमाने जे हे इतिहास तयार झाले, त्यांचा ग्रीक लोकांनी कांहींच उपयोग केला नाही. त्यामुळे, अर्थातच त्यांची वाताहात झाली, हे विशेष रीतीने सांगावयास नको. शिवाय, विरोससची स्वभाषा बॉबिलन्, मॉनिथोची मिश्री, व मिनॉण्डरची फिनिश होती. त्याकारणाने, एकीची शराकृतिलिपि, आणि दुसरीची काही अक्षरे, ही त्या त्या इतिहासकारास चांगल्या रीतीनें अवगत असत. सबब, जर त्यांचे इतिहास ग्रीक अथवा मासिडोनियन् विजे त्यांनी राखले असते, अथवा ते जपून ठेविले असते, तर त्यांच्याच आधारे त्या त्या देशाचे विशेष विसृत व व्यापक इतिहास लिहून ठेवण्यास उत्कृष्ट संधि मिळती, हे निर्विवाद आहे. शिवाय, सदरहू इतिहासांचे संरक्षण झाल्याने, आणखी