पान:भाषाशास्त्र.djvu/315

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०६ भाषाशास्त्र. विद्वान, यांचा अभिप्राय आहे. ह्यापैकी, प्रिन्सेप्ने तर आणखी असेही आपले स्वतःचे मत प्रदर्शित केले आहे की, पुराणतम ग्रीक भाषेतील अक्षरे म्हटली, म्हणजे संस्कृत वर्णाचा केवळ विपर्यासच होय. अर्थात्, संस्कृत वणचेच ग्रीक लोकांनी अनुकरण केले. परंतु, ते त्यांजला बरोबर न साधल्या कारणाने, त्यांनी ते कसे तरी उलट सुलट गिरविले; आणि त्यांजला जसे वळण लागले, त्याप्रमाणेच त्यांची कायमची अक्षरे बनली, इतकाच त्याचा मथितार्थ समजावयाचा. | - | १ प्रिन्सेप म्हणतो, • The oldest Greek 10@s nothing more th@na Sanaslerit trumed topsy-tung." (Journal Bengal Asiatic Society. vol. VI. P. 219. 1839 ). सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.)