पान:भाषाशास्त्र.djvu/296

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. ૨૮૭ म, न, र, ( ज, झ, श, स, ), (क्स, झ, अगर ग्झ ), व झ, असे अनुक्रमें आहे. अर्थात् , तें वर्णोच्चाराहून काही अंशी, किंबहुना बरेच भिन्न आहे, हे विशेष रीतीने सांगावयास नको. मासल्याकारिता, वाचकांनी Fruit, Hero, ( Sir, Sight, 1dea, Ignite, Iliad ), Luxury, Man, Nurse, River, ( Vision, Baptism, Sure, Sea ), ( Fox, Xer xes, Exist ), Yes, Zone, इत्यादि शब्द पहावे; म्हणजे त्यावरून, आमच्या प्रतिपादनाची सत्यता त्यांजला भासमान होईल. | तथापि, वाचकाची ज्यास्त खात्री होण्यासाठी, आह्लीं। याहूनही भिन्न असे दुसरेंच उदाहरण घेऊन, तें त्यांच्या पुढे ठेवितो. म्हणजे, त्यावरून देखील, आमच्या म्हणण्याचे इंगित त्यांच्या लक्षांत सहज येईल. व्ही, आय, आणि झेड्डु, ( Viz ), हे एका शब्दांतलेच तीन वर्ष होत. तथापि, त्यांचा उच्चार वर्णमूल्याप्रमाणे न होता, तो नेम्ली (Namely ) असा भलताच करण्यात येतो. ७ सातवा दोष ह्मटला ह्मणजे, वर्णोच्चाराचा दुरुपयोग हाय. ह्यांत, वर्णोच्चार आणि वर्णमूल्य, वणचाराचा दुरु- यांत कांहीच साम्य नसून, त्यांत ‘पयोग. केवळ जमीन अस्मानाचे अंतर आहे, असेही म्हटले असतां चालेल. उदाहरणार्थ w चे मूल्य फक्त वच असून, त्याचा वर्णोच्चार डब्ल्यू आहे. जसे wor, Wont, इस द. अर्थात, ह्यामुळे, वर्णमूल्याचा अगर वच्चाराचा दुरुपयोग झाला, असे म्हणण्यास काडामात्रही हरकत नाहीं.