पान:भाषाशास्त्र.djvu/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ भाषाशास्त्र. भाषेत र नाही. तसेच सामुद्रिक भाषांत, व ओथोमी, काफीर, कित्येक अमेरिकन, हूरोण, आणि मेक्सिकन लोकांच्या भाषांतही तो वर्ण नाहीं; व झन्द, सांकेतिकलिपि, आणि जपानी, अमेरिकनु, व आफ्रिकन् भाषांच्या कांहीं पोटभेदांत, ल आढळून येत नाहीं. अशाप्रकारे, अवश्य त्या वर्णाचा लोप असल्यामुळे, कसे वणान्तर होते, व किती घोटाळा माजतो, ते ध्यानात ठेवण्यासारखे आहे. काही दिवसापूर्वी, क्यापट्न् कुक नांवाचा एक इंग्रजकामगार सोसायटी आयलंड्ज नामक बेटांत गेला होता. तेथे गेल्यावर, त्या लोकांनी त्याला त्याचे नांव विचारल्यावरून, त्यांनी ते त्यांस कळविले. परंतु, हे नामधेय कंठ्यवर्णात्मक होते, तेव्हां उघडच ते त्यांजला उच्चारतां येईना. कारण, त्यांच्या भाषेत कंठ्यवर्णाचा अगदीच अभाव आहे. त्यामुळे, कुकच्या ऐवजी ते त्याला टट. । असे हाक मारीत, आणि कोणी टुट् कामगार आला आहे असे ते लोकांस समजावून देत. पण, टुटू शब्दानें कांही बोध हेाइना, व उद्भवलेला घोटाळाही कांहीं केल्या राहीना, अशी स्थिति झाली. असो. सदरहू विवेचनावरून, संस्कृताइतकी मूलाक्षरे अन्य कोणत्याही भाषेत नसून, त्यांची अशाप्रकारची इतकी पद्धतशीर, परिपक्वतेची, व संपूर्ण तेची व्यव भारतीयांखेरीज अन्य कोणत्याही राष्ट्राने आपापल्या लाविलेली नाही, असे कोणाच्याही लक्षांत सहज येईल. 1 See Rawlinson's Behistun, P. 146, Spievels Paisi Grammatik. P. 34. ई