पान:भाषाशास्त्र.djvu/282

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. २७५ हीब्यू भाषेत २३ व्यंजने आहेत. फीनिश भाषेत फक्त ११ च आहेत. ग्रीक भाषेत १४ व्यंजने आहेत. मात्र, ह्यांच्या भरतीला आणखी ३ संयुक्त व्यंजने घेतली असल्याचे दिसते. | ल्याटिन भाषेत, १ संयुक्त व दुसरी १६ मिळून १७ व्यंजने आहेत. | झुलू किंवा काफीर भाषेत २६ व्यंजने असून, शिवाय अनुनासिकेंही आहेत. इंग्रजी भाषेत २० व्यंजने आहेत. कित्येक भाषांत कंठ्यवर्ण नसून, कांहीत ओठ्य ही नाहींत. कांहीं कांहींत ल, फ, झ, र, स, ह्या वर्णाचा अगदी लोप असतो; आणि कित्येकांत, क व ग, या वर्णद्वयांतील भेद मानण्यांत येत नाहीं. | सोसायटी आयलंडस् नामक बेटांत जी झाषा चालते, तिच्यांत कंठ्य वर्ण नाहींत; व माहाक, सिनीक, ओनंदगो, ओनीड, कयुग, आणि तुष्कोर, या भाषांत ओठ्य वर्णाचा लोपच असल्याचे आढळून येते. त्याचप्रमाणे, ओटीहररो भाषेत झ, फ, र, ल, स, हे वर्णच नाहींत. ग्रीक भाषेत य, व, फ, आणि मृदु व ऊष्म वर्ण नाहींत. ल्याटिनमध्येही त्याच प्रमाणे मृदु ऊष्मवर्ण, व च, या वर्णाचा अभाव आहे. उच्च जर्मन भाषेत व, य, घ, च, आणि ज, हे वर्ण नाहींत. आरबी भाषेत पी नाहीं; आणि फिनिश, लिथूनियन्, अस्सल स्लेव्हाँनिक. तार्तरी, मोगली, व ब्रह्मी, या भाषांत फ नाहीं. चिनी १ मॉक्समुलरची भाषाशास्त्रविषयक व्याख्याने. भाग २ रा पहा.