पान:भाषाशास्त्र.djvu/270

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २६३ आली, आणि त्याची शुश्रूषा, विद्याभ्यास, व संगोपन होण्यासाठी, त्याला एका विद्वान ब्राह्मणाच्या घरी ठेवण्याचे ठरले. ह्या ब्राह्मणाने त्याचे योग्य पालन पोषण केलें, व दहा वर्षे त्याजकडून वेदाध्ययन करविले. इतकेच नव्हें तर, त्याने त्याला प्रत्यक्ष पोराप्रमाणे आपल्या मुलीबरोबरच कांहीं एक किंतु मनांत न बाळगतां वाढविले. कालान्तराने, ती दोन्ही मुले मोठी झाली, आणि एकमेकांवर प्रेम करू लागली. त्यामुळे, त्या वृद्ध ब्राह्मणास त्यांचे कौतुक वाटून, त्या मुलीचे पाणिग्रहण त्या मुलाशी करण्याचा त्याने घाट घातला. हे निष्कपट व प्रेमाचे वर्तन पाहून, फीझीला खरोखरच गहिवर आला, आणि जरी त्याचे अकृत्रिम प्रम त्या ब्राह्मणाच्या मुलीवर जडले होते, तरी गुरूच्या ठायी असलेल्या कृतज्ञतेमुळे, खरी वस्तुस्थिति गुरूच्या पढे साद्यन्त मांडण्याचा त्याने निश्चय केला. तदनंतर, घडून आलेली इत्थंभूत हकीकत त्याजपाशी निवेदन करून, कृतापराधाची क्षमा होण्यासाठी, त्याने त्याला शिरसाष्टांग नमस्कार घातला. ही सर्व हकीकत क्रोधायमान न होता, त्या ब्राह्मणाने अगदी शान्तपणे ऐकून घेतली. परंतु, अद्विजावर आणि अतएव अपात्रस्थली वेदाध्यापनाचे संस्कार झाले असे मनांत येऊन, त्याला अतिशय पश्चात्ताप झाला, व त्यासर. शीच असलेली सरी त्याने आपल्या पोटांत खुपसली. परंत फाझाने ती त्याच्या हातांतून तत्काळ हिसकावून घेतली; नाही तर त्याचा तत्क्षणच मोक्ष झाला असता. असो. हा दुर्धर आणि घोर प्रसंग टळल्यावर, फीझीनें त्या वृद्ध गुरूचे सान्त्वन केले, व तिचे निरर्थकत्व. कृतापराधाबद्दल हवे ते प्रायश्चित्त भोग