पान:भाषाशास्त्र.djvu/267

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० भाषाशास्त्र, व्या वर्षी मरण पावला. हा भरतखंडांत होता त्या मुदतीत बराच फिरला, आणि विशेष शोध करून, हिंदूंची विद्या, त्यांची शास्त्रं, त्यांच्या कला, व त्यांची अगाध ग्रंथसंपत्ति, इत्यादिसंबंधी त्याने तपशिलवार आणि साद्यन्त माहिती मिळविली, व तरीखुल-हिन्द नांवाचा एक नवाजण्यालायक ग्रंथ लिहिला. ह्यांत हिंदूच्या वाङ्मयाची इत्थंभूत हकीकत आहे. आलबिरूणी हा संस्कृतांत फारच निष्णात अस ल्याचे दिसते. कारण, त्याने सांख्य आणि योगदर्शनाचे संस्कृतांतून आरबत भाषान्तर केले आहे. इतकेच नव्हे तर, दुस-या दोन आरबी ग्रंथांचा, त्याने आरबींतूनही संस्कृतांत तरजमा केला. त्यानंतर, इ. स. ११९० च्या सुमारास, अबुसालेने राजनीतीचे संस्कृतांतून आरबीत भाषांतर केलें; राजनीतीची व दु _ व पुढे दोनशे वर्षांनी नगरकोट हे फेरोसरी भाषांतरे. 'S जशहाच्या हस्तगत झाल्यावर,दुसन्याही अनक संस्कृत ग्रंथांची भाषान्तरे करप्यांत आली; आणि मौलान इजद्दीन खलितखानी याने ते काम मोठ्या झपाट्याने चालविले. इ. स. १८३१ साली, शालिहोत्राचा अश्वचिकित्सेवर जो ग्रंथ होता, त्याचे भाषान्तर झालें, व त्याची एक नक्कल लखनो येथील राजग्रंथालयांत ठेविली. शालिहोत्र हा सुश्रुताचा शिक्षक असून, तो नामांकित अश्वचिकित्सक होता. आणि म्हणूनच, त्याच्या नांवाचा उल्लेख विष्णुशम्यनें पंचतंत्रांत व गगने अश्वायुर्वेदांत केल्याचे दिसते. अश्वचिकित्सेवर चाणक्याचाही एकादा ग्रंथ आहेसे वाटते. कारण, त्याचा उल्लेख हाजीचाल्फाने केला आहे. १ Elliot's Historians of India. P. 96.