पान:भाषाशास्त्र.djvu/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५४ भाषाशास्त्र. ज्ञासा होऊन, ती दिवसानुदिवस प्रबल होत चालली. परंतु, ती एकदम सफल होण्याला मार्गच नव्हता. कारण, ह्या धर्माची बहुतेक पुस्तकें संस्कृतांतच लिहिलेली होती, आणि ही भाषा कठिण असल्यामुळे ती समजण्याची अडचण पडे. तथापि, नूतनधर्मविषयककुतूहल जागृत झाल्याने, चिनीलोकांची सं- संस्कृत शिकण्याची अभिरुचि कालास्कृताविषयीची अभि- न्तराने उत्पन्न होऊन, ह्या अमूल्य रुचि. | भाषेचे ज्ञान संपादन करण्यासाठी, चीन देशांतले कित्येक लोक प्रवृत्त झाले; आणि तिकडून बरेच लोक भरतखंडांत येऊ लागले. त्यायोगाने, संस्कृतभाषेचे ज्ञान फैलावले, व अनेक धर्मग्रंथांची भाषान्तरेही झाली. शिवाय, ह्या धर्माची मूलतत्त्वे लोकांच्या व्यावहारिक भाषेतच त्यांस समजावून दिली पाबौद्ध धमामुळे प्रा- हिजेत, अशी बहाची आज्ञाच असकृत भाषांस उत्तेजन. । ल्याने, पाली, मागधी, वगैरे अनेक प्रचलित भाषांतच धर्मसंबधीं नानाविध ग्रंथ रचण्यांत येत, आणि त्या कारणाने, त्या त्या भाषांतून, तिबेटी, ब्रह्मी, चिनी, व जपानी, या भाषांत त्यांची भाषान्तरे होत. त्यामुळे, कांहींअंशी भाषाशास्त्राला दुाहिरी साहाय्य झाले, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण, एकतर संस्कृत भाषेची आभरुचि भिन्नभिन्न प्रांतांत आणि दुरदरच्या देशांत वाढत | १ सिंहलद्वीपांतील वाङमयांत, धर्मग्रंथाच्या ह्या पवित्र भावला जिनवचन अशी संज्ञा आहे. जिनवचन म्हणजे बुद्धाची भाषा होय. महावशांत पालीभाषेला धर्मग्रंथ अशीच संज्ञा आहे. के चित्, तंति या नांवाने देखील ती सुप्रसिद्ध आहे. आणि मागधीला कोठे कोठे मूलभाषा देखील म्हटले असल्याचे आढळून येते.