पान:भाषाशास्त्र.djvu/260

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २५३ ह्याजवरच गोविन्दकृत काव्यप्रदीप नांवाची व्याख्या आहे. वामनकृत काव्यालंकारवृत्ति; इ. स. चे बारावे शतक. विश्वनाथकृत साहित्यदर्पण; इ. स. चे पंधरावे शतक. | तात्पर्य, भाषाशास्त्राच्या या शाखेतसुद्धा आम्ही बिलकुल मागें नव्हतो, असे कोणाच्याही लक्षांत सहज येईल. असो. याप्रमाणे, भाषाशास्त्राच्या कामी, आमच्या भारततर पौरस्त्यां- भारतीयांच्या परिश्रमाचें सामान्य चे भाषाशास्त्राच्या का: दिग्दर्शन केले. सबब, आम्हांखेरीज मी प्रयत्न. अन्य पौरस्त्यांनी एतद्विषयक कशा प्रकारचे प्रयत्न केले, याचा आतां थोडक्यात विचार करू. इ. स. पूर्वी ५०० वर्षांच्या अगोदर, भरतखंडांत एक बौद्धधर्माचा प्रसार विलक्षण धर्मक्रान्ति होऊन गेली, हे व संस्कृत भाषेची अ- वाचकास माहीत असेलच. ह्या धर्म भिवृद्धि. | क्रान्तीने बौद्धधर्माचा फैलाव झपाट्याने झाला, आणि तो पूर्वेकडील चीनसमुद्र व त्याच्याही पलीकडील स्थीरमहासागरापासून तो थेट पश्चिमेकडे व्होलगा नदीपर्यंत जाऊन थडकला. अर्थात् , पूर्वेकडील ब्रह्मदेश, चीन, व जपान, आणि उत्तरेकडील तिबेट, या देशांत ह्या धर्माचा प्रवेश विशेष झाला; व त्यामुळे, त्या त्या देशांतील लोकांना ह्या धर्माचे रहस्य कळण्याची जि १ ह्यासंबंधाने प्रोफेसर वेवर म्हणतोःFor the rest, in the field of rhetoric and poetics, the Hindu Mind, so fertile in nice distinctions, has had free scope, and has put forth all its power not seldom in an extremly subtle and ingenious fashion. ( History of Sanskrit Literature. P. 232. ) | २३