पान:भाषाशास्त्र.djvu/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
भाषाशास्त्र.न्नत्व असतें, व तें स्वरानुपूर्व्यानें व्यक्त केलेलें दृष्टीस पडतें. किंबहुना, भाषा म्हणजे समाजानें निर्माण केलेली कृति, असे देखील म्हणण्यास हरकत नाहीं.

भाषा ही देवी नसून, ती मानुषी आहे.

 ह्यावरून, भाषा ही कृतक किंवा समाजघटित आहे, असें वाटतें. आणि म्हणूनच, तिची उत्पत्ति व उत्क्रान्ति केवळ मनुष्याच्या प्रयत्नानेच झाली असल्याचें दिसतें. अर्थात्, ती अमानुषी किंवा दैवी असावी, अशी कल्पना करण्यास बाध येतो. कारण, आपण हल्लीं जी भाषा बोलतों, ती प्रस्तुतच्या स्थितींतच आपणाला ईश्वराकडून मिळाली नसून, तिच्यांत आजपर्यंत अनेक सुधारणा, असंख्य फेरफार, आणि अकल्पित रूपान्तरें देखील झालेली आहेत. इतकेच नव्हे तर, कित्येक प्रसंगीं तींत समाजाच्या इच्छेनुरूपच फेरबदल होतात, हे अगदी सप्रमाण दाखवितां येईल.

 ह्या संबंधानें लॉर्ड माँनबोडोसारख्या बहुश्रुत गृहस्थाचा अभिप्राय फारच चमत्कारिक असल्याचें दिसतें. कारण, त्यानें एके ठिकाणीं असे प्रतिपादन केलें आहे कीं, ईश्वरी साहाय्य व दैविक मध्यस्तीशिवाय, भाषेचा उद्गम होण्याला मार्गच नसून, ही मूळभाषा मिसर देशांतील असुरी


 १ "Language is the creation of Society." ( Sayce's Introduction to the Science of Language. P. 75 ).

 २ Ancient Metaphysics. ( vol. IV. P. 357.)