पान:भाषाशास्त्र.djvu/218

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २११ बद्दलचे थोडेसे दिग्दर्शन याठिकाणीच केले पाहिजे. कारण, तसे न केले तर, कालनिर्णय होण्याला, प्रस्तुतग्रंथांत कांहीं एक साधन उपलब्ध होणार नाही. सबब, ही दर्शनींच भासमान होत असलेली उणीव दूर व्हावी म्हणून, तत्संबंधी अवश्य ते विवेचन येथे करते. शाकटायन व यास्के यांचा काल अजूनही यथार्थ निश्चित झालेला नाही. तथापि, हे दोघेही पाणिनीच्या पूर्वीचे असल्याविषयी निर्विवाद असून, पाणिनीचा काळ थोड्याबहुत प्रमाणाने ठरल्यासारखाच आहे. सबब, ह्याचा काल प्रथमतः देऊन, त्यावरून राहिलेल्या वैयाकरणद्वयांच्या कालाची मर्यादा वाचकापुढे ठेवितों. | पाणिनीचा काल आम्हा पौरस्त्यांच्या मते बराच प्राचीन असून, कित्येक पाश्चात्य पाणिनीचा काल, व त्यासंबंधाने पौर- त्याला तितका पुरातन समजत नाहींत. स्त्य व पाश्चात्यांत पंडित सत्यव्रत सामश्रमीच्या अभिमतभेद. प्रायाप्रमाणे, तो इ० स० पूर्वी २४०० वर्षांच्या सुमारास उदयास आला असल्याचे दिसते. परंतु, डाक्तर रामकृष्ण गोपाळ भांडारकरे यांचे तसे मत नाहीं. कारण, ते असे म्हणतात की, तो इ० स० ७०० साली झाला असावा. आतां, पाश्चात्यै विद्वानांकडे पाहिले तर ते पाणिनीला याहीपेक्षा अर्वाचीनत्व आणू पाहतात, आणि असे प्रतिपादन करितात की, १ उपोद्घात. निरुक्त. भाग था. पान झि ०. । ३ दक्षिणचा प्राचीन इतिहास. आवृत्ति २ री. पा. ९. ३ बोटलिंग, वेबर, मॉक्समुलर, इत्यादि.