१९८ भाषाशास्त्रः . . ठिकाणी सर, विल्यम जोन्स हा अगदीं निष्प्रांजलपणे असे लिहितो की, हिंदूच्या ग्रंथसंपत्तीचे अवलोकन करून, त्यांतील कोणत्याही शाखेकडे आपण पाहिले, म्हणजे ह्या भारतीय वाङ्मयाचा बिलकुल अन्तच नाही, अशी सहजीच कल्पना होते. कारण, ह्या भूतलावरील अत्युच्च पर्वत हिमाचलच असल्यामुळे, तो जसा आपले डोकें सदैव वर करून इतर पर्वतसमुदायास केवळ वल्मांक किंवा लहान लहान वारूळाप्रमाणेच मानतो, तद्वतच ह्या भरतखंडाबाहेरील यच्चावत् ग्रंथसमुदायाची स्थिति असून, अन्य देशांतील प्रचंड वाङ्मय म्हणजे इकडील ( भरतभूमीतील) केवळ बालक्रीडाच होय. आतां, पाश्चात्यांच्या अभिप्रायाप्रमाणे सर्व बाजूंनी सुधारलेला असा जो ग्रीसदेश, आणि त्यांनी रानटी म्हणून जगजाहीर केलेले व ठरविलेले असे जे आमचे भरतखंड, यांची परस्पर तुलना केली तर, आपणांस असे दिसून येईल की, भाषेच्या संबंधाने ग्रासदेशांत श्रीगणेशायनमःच्या धड्याची सुरुवात देखील नव्हती, अशा वेळी, भरतखंडांत शब्दव्युपित्ताचे विवेचन आणि भाषाशास्त्राचा ऊहापोह सर्रास्त चालला होता. आणि म्हणूनच, ती गोष्ट मॉक्समुलरसा १ तो म्हणतो, “ Wherever we direct our attention to. Hindu literature, the notion of infinity presents itself, and surely the longest life would not suffice for a single perusal of works, that rise and swell protuberant like the Himalayas above the bulkiest composition of every land beyond the Copmes of India, सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.)
पान:भाषाशास्त्र.djvu/205
Appearance