पान:भाषाशास्त्र.djvu/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सामान्यविवेचन व दिग्दर्शन.येतात; किंवा उद्भिद्विद्येंत ज्याप्रमाणें वनस्पतींच्या गुणधर्मांचेही हुबेहूब वर्णन होतें; त्याचप्रमाणें भाषाशास्त्राचें असून, ह्याचे नियम देखील पुष्कळ बाबतींत अगदीं ठरीव व अबाधित आहेत. मात्र, इतकेंच कीं, इतर शास्त्रें जशी पूर्णतेप्रत पोहोचली आहेत, अथवा पोहोचण्याच्या रंगांत आहेत, त्याप्रमाणे ह्या शास्त्राचें नसून, तें नुकतेच वाढीस लागलें आहे. किंबहुना, तें अजून बाल्यावस्थेतच आहे, असेंही म्हटलें असतां चालेल.

भाषाशास्त्रविषयक साधनांची परिपूर्णता.

 तथापि, अशा प्रकारच्या प्रथमावस्थेत सुद्धां, शोधक मनुष्याला, हे भाषाशास्त्र पूर्णतेस आणण्याला, कोणत्याही साधनाची बिलकूल वाण नाही. कारण, ह्या भाषामहोदधींत, शब्दमौक्तिकांच्या असंख्य शुक्तिका, इतस्ततः, आणि द्वीपसमुदायांत, व खंडान्तरी, एकसारख्या पसरलेल्या असून, त्या गोळा करण्यासाठीं, ज्यानें म्हणून आपली कास धैर्याने व एकनिष्ठेने बांधली आहे, त्यास त्या प्राप्त झाल्यावांचून खचितच राहणार नाहींत. फार तर काय सांगावे, पण, त्या शुक्तिकांतील अपूर्व आणि उज्ज्वल दीप्ति त्यास लागलींच भासमान होऊन, त्यांतील प्रत्येक शब्दमौक्तिकांचा साद्यन्त इतिहास त्याच्या डोळ्यांपुढें केवळ मूर्तिमंतच उभा राहील.

भाषा सामग्रीचीं स्थळे.

 मासल्याकरितां, आपण आपले भरतखंड अथवा आर्यावर्तच जरी घेतले, तरी त्यांत देखील, अतीव अमूल्य रत्नांची एक विशाळ खाणच सांपडेल. येथून, असंख्य शब्दांनीं कोठ