पान:भाषाशास्त्र.djvu/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८३ भाषाशास्त्र. ती मजबूत तटबंदी केल्यावर, ते ह्या दुर्भेद्य दुर्गंत कायम जाऊन राहिले असावे, असे अनुमान होते. ह्या प्रदेशांत, आर्यसी व अन्तर्याणी नांवाचे लोक अजूनही आहेत, व डरायसच्या कारकीर्दीत तुराणी किंवा सिथियन लोकांचा आर्यन्तसे नांवाचा राजाही तेथे होता. इतकेच नव्हे तर, क्षीराक्षसाच्याँ समकालीनाचें नांव अरिपिथिस् ह्मणजे आर्यपति असे होते, आणि अस्पकर, अस्परथ, स्पर्गपिथिस, इत्यादि, अश्वकर, अश्वरथ, व स्वर्गपति, या संस्कृत शब्दांपासूनच झालेले, परंतु अपभ्रष्ट स्थितील राहिलेले सिथियन ( ह्मणजे तुराणी ) शाखेतले शब्द होत, यांत संशय नाहीं. , याप्रमाणे, आशियाखंडांत आमच्या आर्य पूर्वजांनी कसकसे व कोठे पर्यटन केले, आणि आपल्या नामधेयाचा चलनी शिक्का कोठपावेतों चालू ठेविला, याचे थोडक्यांत दिग्दर्शन केले. सबब, आतां, यूरोपखंडाकडे वळू, ब तिकडे आर्यनामाचे मूळ कोणकोणत्या प्रदेशांत, किती, आणि कशा प्रकारे खोल गेले आहे, याविषयीचा विचार करूं. • यूरोपखंडांत आर्यशाखांचा प्रवेश दोन मार्गांनी झाला १ ही आर्य शब्दोद्भवच नांवें होत, यांत संशय नाहीं. | २ हे नांव कदाचित् आर्यन्त असावेसे वाटते. अर्थात्, आर्यांनी ह्या राजाचा पराभव केल्यावर, तो इकडे पळून आला असल्याचे संभवते. कारण, आर्यांनी केला आहे अन्त ह्मणजे पराभव ज्याचा, तो आर्यन्त,' असें समासावरून दिसते. 3 Xerxes. छ । दि ।