Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० | भाषाशास्त्र. संस्कृतच्या शाखा नाहीत, असे म्हणता येणार नाही. कारण, ज्याप्रमाणे संस्कृत, ग्रीक, ल्याटिन् , इंग्रजी, इत्यादि भाषांत महदन्तर आहे, त्याचप्रमाणे संस्कृत, व मराठी, बंगाली, हिन्दी, गुजराथी, वगैरे प्राकृत भाषांत देखील फारच भेद आहे. आणि असे असूनही, संस्कृत ही प्रा कृत भाषांची मायभाषा असल्याबद्दल आखल विद्वज्जनसमूहाचे मतैक्यच आहे. शिवाय, वेदकालीन संस्कृतांत व तदनंतरच्या लौकिक संस्कृतांत देखील पुष्कळ फरक दि. सून येतो. परंत, तेवढ्याच कारणाने, प्राकृत, पाली, झन्द, ग्रीक, ल्याटिन्, इंग्रजी, इयादींची संस्कृत ही मायभाषा नव्हे, असे म्हणणे, किंवा वेदकालीन संस्कृत व तदनन्तरचे लौकिक संस्कृत ह्या भिन्नभिन्न भाषा होत, असे प्रतिपादन करणे, केवळ भ्रातिमूलकच होईल, अशी माझी अल्प समजूत अ.हे.. ह्याखेरीज, मायभाषा कोणती आणि तिच्या शाखा कोणत्या, मायभाषा ठरवि- हे ठरविण्याच्या संबंधाने मुख्यत्वेकरून तांना मुख्यत्वेकरून विशेष मुद्याची गोष्ट पाहणे आहे ती विचार करण्याची गोष्ट ही की, समाजावस्थेतील बाल्यदर्शत जे व्यावहारिक शब्द सर्वत्र प्रचारांत असण्याचा जास्त संभव आहे, ते शब्द ज्या भाषांत पर्यायाने अथवा अपभ्रष्टस्थितीत दृष्टीस पडतात, त्या भाषांस शाखा किंवा दुहिता समजून, अशा प्रकारच्या शब्दांचे मूळ, अगर खरें रूप, अथवा शुद्ध स्वरूप, ज्या भाषेत दृग्गोचर होते; इतकच नव्हे तर, तिच्या पलीकडे सदरह शब्दांची मीमांसा - १ लौकिक संस्कृत म्हणजे उत्कृष्टावस्थेप्रत पावलेली संस्कृत भाषा होय. हिलाच इंग्रजीत Classical Sanskrit म्हणतात.