पान:भाषाशास्त्र.djvu/148

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १३९ रत्नांचे जेव्हां नानाविध अलंकार चढले, तेव्हा तिला अर्थातच संस्कृत असे अन्वर्थ नामधेय पडले. संस्कृत भाषेपासून प्राकृत भाषा उद्भवल्या असल्याचे ती मायभाषा मा- तर सर्वासच कबूल असून, ही गोष्ट नण्यास कारणे. ज्याप्रमाणे सप्रमाण सिद्ध आहे, त्याचप्रमाणे संस्कृत भाषेपासुनच झन्द, ग्रीक, ल्याटिन, इत्यादि भाषा देखील प्रसृत झाल्या असल्याबद्दल नि:संशय होत आहे. कारण, प्राकृत भाषांतील शब्दांचे मूळ जसे संस्कृत भाषेतच उपलब्ध होते, तसे झन्द, ग्रीक, ल्याटिन, वगैरे भाषांचे मूळही ह्या गीवाण भाषेतच सांपडते. परंतु, संस्कृत भाषेच्या संबंधाने तशी गोष्ट बिलकल दिसून येत नाही. इतकेच नव्हे तर, ह्या भाषेतील शब्दांचे मूळरूप किंवा उगमस्थान, संस्कृताशिवाय अन्यत्र कोठे सुद्धा उपलब्ध होत नाहीं; अथवा, त्यांची मुळे देखील दुसरीकडे कोठेही असल्याचे भासत नाही. सबब, संस्कृत हीच सदरह शाखांची मायभाषा होय, असे वाटते. आतां, कोणी कदाचित् अशी शंका घेईल नहीं, जर संस्कृत पासून ग्रीक, ल्याटिन्, संस्कृत व तिच्या इंग्रजी, इयादि भाषा उद्भवपासून उद्भवलेल्या त्याचे मानले, तर संस्कृतांतील शाखा, यांत महदन्तर. | आणि ग्रीक, ल्याटिन्, इंग्रजी, वगैरे भाषांतील शब्दांत पुष्कळ फरक दिसून येत असल्यामुळे, ह्या भाषांची संस्कृत ही मायभाषा असेलसे वाटत नाही. परंतु, सदरीं निर्दिष्ट केलेल्या निरनिराळ्या भाषांत शब्दभिन्नता दृग्गोचर होते, एवढ्याच कारणाने, त्या भाषा