पान:भाषाशास्त्र.djvu/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ । ३। । भाषेचे उगमस्थान. १३७ च्यांत अनेक भेद होत जाऊन, मूळ शब्दांतही महदन्तर पडत पडत चालले. ।। असो. अशा प्रकारची वस्तुस्थिति असून, ती तशी संस्कृत मायभाषे- आहे असे मानण्यासही अनक बलवच्या संबंधाने कित्येक तर कारण दृग्गोचर होतात. तथापि, पाश्यात्यांची समजूत. संस्कृत भाषेचा उचित असलेला हा मातृपदवीचा बहुमान तिला न देता, कित्येक पाश्चाय पंडित तिला स्थानभ्रष्ट करतात, व सहादर पंक्तीलाच बसवितात. परंतु, हे त्यांचे करणे सयुक्तिक असल्याचे दिसत नाही. कारण, संस्कृत ही दुहिता किंवा शाखा ठरविली तर, ती ज्या भाषेपासून उत्पन्न झाली, अशी कोणती तरी तिच्याहून भिन्नं अशी अन्य भाषा असली पाहिजे. परंतु तसे बिलकुल नसून, संस्कृत किंवा आर्यभाषा हीच जननी असल्यामुळे, तिच्याकडे मातृपदाचे श्रेष्ठत्व सहजीं येऊ पाहते. आतां, कोणी कोणी असा आक्षेप घेतात की, हल्लींचा | त्यांनी घेतलेला संस्कृत भाषा जी अगदी पूर्णतेच्या आक्षेप व त्याचे निर- उच्च कोटी प्रत पोहोचलेली दिसते, सन. ती प्रथमत:च तशी नसून, वेदकाली किंवा त्याच्या पूर्वी जी संस्कृत भाषा प्रचारांत होती, तिजवर नाना प्रकारचे अलंकार चढल्यामुळे, तिला हल्लींची स्थिति प्राप्त झाली आहे. आणि ती ज्या मूळ स्थितीत होती, तिच्यापासूनच संस्कृताची सांप्रतची परिणति झाला असल्याने, तत्कालीन आर्यभाषेचीच संस्कृत ही दुहिताः किंवा शाखा होय. परंतु, हे त्यांचे म्हणणे युक्तिवादास अनुसरून आहेसे वाटत नाही. कारण, कोणत्याही भाषे..