पान:भाषाशास्त्र.djvu/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषेचे उद्गमस्थान. १२९ तदनन्तर, शब्दमाधुर्य, अर्थगांभीर्य, व पदलालित्य, इत्यादि संबंधाने त्यांच्यात उत्तरोत्तर ज्यास्त लालसा उत्पन्न होत जाऊन, तिच्यांत शब्दजालांची नवीन भर पडत गेली, व त्यायोगाने तिला आपोआपच सौन्दर्य प्राप्त होत चाललें. इतकेच नव्हे तर, ती केवळ लावण्याची खाणच बनावी या हेतूनें, कित्येक कविपुंगवानी तिच्यावर अत्त्युत्कृष्ट अलंकार चढविले, आणि आपल्या अव्याहत श्रमाने तिला अगदी परिपक्व दशेप्रत पोहोचविले. - अशा प्रकारे, विद्वज्जनांच्या उत्कट प्रयत्नांनी अनेक सुसंस्कार होऊन, जी आर्यभाषा केवळ पूर्ण व उन्नतावस्थेला पोहोचली, ती आपोआपच संरकृत बनली, आणि म्हणूनच तिला संस्कृत असे अन्वर्थ नाव पडले. आतां, इराणी, ग्रीक, रोमन, जर्मन, इंग्रज, इत्यादि सर्व राहें भारतीय आर्यांचेच वंशज आहेत. सबब, झन्द, ग्रीक, ल्याटिन्, जर्मन, इंग्रजी, इत्यादि भाषा ह्याच आर्य म्हणजे संस्कृत भाषेच्या पाश्चात्य शाखा असून, पल्लवी ( पाली भाषा ), सिंधी, पंजाबी, हिन्दी, बंगाली, उरीय, गुजराथी, मराठी, वगैरे तिच्या पौरस्य शाखा होत. अर्थात्, संस्कृत ही सर्वांची मायभाषा बनली, हे वाचकांच्या लक्षांत सहज येईल. हे माझे म्हणणे कदाचित् कोणास अतिशयोक्तीचे दिसेल, . त्याबद्दलचे प्रमाण. अथवा, ते वस्तुस्थितीपासून भिन्न आहे, असे ही कोणास खचितच वाटेल. सबब, माझ्या प्रति १ ह्या संबंधानें तपशिलवार विवेचन भारतीय साम्राज्याच्या नवव्या पुस्तकांत केले आहे; सबब तिकडे वाचकानी आपले लक्ष पुरवावे. विशेषतः भाग ५२ वा पहावा. ( ग्रंथकर्ता.)