पान:भाषाशास्त्र.djvu/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा, भाषेचे उद्गमस्थान, मागील भागांत, भाषेची उत्पत्ति कशी झाली, या भाषा व मानवी बद्दलची सामान्य हकीकत मी वाचप्राणी यांच्या उद्ग- कापुढे ठेविली. आतां, प्रस्तुत भामस्थानाचा विचार. गांत तिच्या उद्गमस्थानाविषयी उपलब्ध असलेली माहिती देण्याचा विचार आहे. । आतां, भाषेच्या उद्गमस्थानासंबंधी विचार करावयास लागलें, ह्मणजे प्रथमतः मनुष्याच्या आदिनिवासस्थानाबइलचाच विचार करणे भाग पडते. कारण, मनुष्याची उत्पत्ति व भाषेचा उद्गम, ही बहुतेक समकालीनचे असली पाहिजेत, असे ह्मणण्यास हरकत नाही. सबब, मनुष्याच्या उत्पत्तिस्थानाविषयी पूर्वी कशी कल्पना होती; भिन्न भिन्न राष्ट्रांत त्यासंबंधानें कांहीं निरनिराळे मत होते क कसे; हल्ली तद्विषयक कसे मत आहे; शास्त्रीय दृष्ट्या ते किती अंशाने सिद्ध होण्यासारखे आहे; याबद्दलचाच अगोदर विचार करूं. सर्व राष्ट्रांत, आमचे आर्थराष्ट्र म्हणजे अर्थात् आम्ही , आर्यहिंदू हे पुराणैतम असल्याकारणाने, सृष्ठयुत्पत्ति | १ थॉर्नटन इतिहासकार म्हणतो:- Ere yet the Pyramids looked down upon the val | ( पुढे चालू )